Crop loan Regular payers नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठीचे प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीतील उर्वरितरक्कम १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांच्याखात्यात जमा करण्यात येईल, अशीमाहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनीमंगळवारी विधानपरिषदेत दिली.
सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम२६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरीलचर्चेला उत्तर देताना मुंडे यांनी कृषीयोजनांचा आढावा घेताना विविधआश्वासने दिली. यासाठी पुरवणीमागण्यात आवश्यक तरतूद करण्यातआल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. यानिर्णयामुळे स्वातंत्र्यदिनापूर्वीशेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Table of Contents
काय होती समस्या?
Crop loan Regular payers ई-केवायसी होत नसल्याने अनेकशेतकऱ्यांची कर्जमाफी रखडलीआहे. तसेच नियमित कर्जमाफीकरणाऱ्या निम्म्या शेतकऱ्यांना अद्याप प्रोत्साहनपर अनुदानमिळाले नसल्याचे सांगत तातडीनेहे प्रश्न सोडविण्याची मागणी आमदारांनी केली होती.

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 ऑगस्टपूर्वी येणार पैसा
शेतीसाठी फायदेशीर योजना
शेतीसाठी फायदेशीर ठरलेलीपोकरा योजना प्रत्येक गावातलागू व्हावी, यासाठी पोकराचादुसरा टप्पा सुरु करण्यात येतआहे. प्रत्येक गावातीलशेतकऱ्यापर्यंत योजनेची व्याप्तीपसरावी, असा राज्य सरकारचाप्रयत्न असल्याचेही मुंडे म्हणाले.
‘जलयुक्त’ मध्ये आणखी ५ हजार गावे Crop loan Regular payers
राज्यात जलयुक्त शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी ५ हजार गावांचा समावेश करण्यात येत आहे. जलपातळी वाढण्यास नक्कीच याची मदत होईल. मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या पूर्णत्वास प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
2 Responses