Krushisahayak

Weather News या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जूनमध्ये मध्य भारतात विशेष करून, महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सध्या कुठे आहे मॉन्सून?

■ सध्या मान्सून हा अंदमान सागरात, तसेच बंगालच्या उपसागराकडे प्रगती करत आहे. हाप्रवाह सध्या सक्षम होत आहे. दीर्घकालीन अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची तारीख ४ जून अशी अपेक्षित ठेवली आहे.

■ यात किमान चार दिवसांचा कालावधी मागे पुढे होऊ शकतो, अशी शक्यता हवामान विभागाचे डॉ.डी.एस. पै यांनी व्यक्त केली. मान्सून यंदा केरळमध्ये १ जूनला दाखल होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

MahaDBT Sheti Yojana Lottery :महाडीबीटी लॉटरी लागली, ही कागदपत्र लागणार

पुन्हा चार दिवस पावसाचा इशारा

■ मुंबईसह राज्यभरातील शहरांच्या कमाल तापमानाचा पारा चढता असतानाच आता हवामान खात्याने पुढील काही दिवसांसाठी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना तुरळक पावसाचा इशारा दिला आहे.

Cibil Score Loan 2023 1:उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशांचं काय झालं?

तीन महिन्यांनंतरच प्रभाव Weather News

■ डॉ. पै म्हणाले, एल निनो म्हणजे कमी पाऊस असे असले, तरी एल निनोच्या वर्षात पाऊस कमी होतोच, असे नाही.१९९७ मध्ये एल निनो प्रभाव जास्त असूनही पाऊस चांगला झाला होता. यंदा एल निनोचा प्रभाव हा मान्सूनच्या जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये कमी असेल.

■ यंदा हिंद महासागरातील मान्सूनला अनुकूल असलेला इंडियन ओशन डायपोल (आयओडी) अर्थात, हिंद महासागर द्विध्रुव हा घटकही असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच एलनिनची स्थिती निर्माण झाली असली, तरी आयओडी या घटकामुळे मान्सून ९६ ते १०४ टक्के पडण्याची शक्यता आहे.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: