Headlines

Champion soyabean oil सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा; पैसे जमा होण्याची तारीखही सांगितली

Champion soyabean oil सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा; पैसे जमा होण्याची तारीखही सांगितली
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Champion soyabean oil भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे येथे अहमदपूर मध्ये आले होते. येथील सभेत शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणाच त्यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये यंदा राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न प्रामुख्याने पुढे आला आहे. त्यातच, गेल्या काही महिन्यात सोयाबीनचे (Farmer) दर चांगलेच घसरले आहेत. त्यामुळे, विरोधकांनी ऐन लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करत शेतकऱ्यांच्या सोयाबिन दरावरुन आवाज उठवला.

Krushisahayak

सुकन्या समृद्धि योजना विवरण, लाभ और पात्रता 2024

विशेष म्हणज मोदींनीही (Narendra Modi) धाराशिवमधील सभेत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना साद घातल्याचं दिसून आलं. मोदींनी गेल्या 10 वर्षात आणि काँग्रेस सरकारमधील दराची आकडेवारीच जाहीर केली. त्यातच, आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde) शेतकऱ्यांना ही गुडन्यूज दिली Champion soyabean oil

भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे येथे अहमदपूर मध्ये आले होते. येथील सभेत शेतकऱ्यांना पैसे देण्याची घोषणाच त्यांनी केली आहे. त्यामुळे, एकप्रकारे निडणूक काळात आचारसंहिता असल्याने कुठलीही घोषणा करता येत नाही, किंवा मतदारांना आमिष दाखवून मत वळवण्याचा प्रयत्न करण्यात येत नाही. मात्र, आता कृषीमंत्र्यांनीच थेट घोषणा करुन तारीखही सांगितल्याने आता विरोधी पक्षातील नेते काय भूमिका घेतात हे पाहावे लागेल.

हेक्टरी 5 हजार रुपये

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपये देणार असल्याची घोषणाच कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी केली. येत्या 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार असल्याची माहितीही धनंजय मुंडेंनी लातूरमधून दिली.

Krushisahayak

इन लोगो को सरकार देती है 50 हजार तक का मुफ्त लोन, जानें जल्दी

खरीपातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी रुपयांचे पेकेज सरकारने जाहीर केले आहे. या पॅकेजच्या माध्यमातून सोयाबिन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 5 हजार रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा धनंजय मुंडेंनी लातूरमध्ये केली. Champion soyabean oil

लातूरमध्ये शृंगारे विरुद्ध काळगे

दरम्यान, कापसाचं मात्र क्विंटलवर द्यायचं की हेक्टरवर द्यायचं हे फक्त अजून ठरवायचं राहिलं आहे. त्यामुळे, तेही लवकरच ठरवलं जाऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही लाभ मिळवून देण्यात येणार आहे. हे पैसे 12 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील, असेही मुंडेंनी सांगितले. 

Krushisahayak

लोकसभा चुनाव के बीच राहत, घट गए कमर्शियल सिलेंडर के दाम, जारी हुई नई कीमतें

लातूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या सांगता सभा आज होत आहेत. त्यासाठी, धनंजय मुंडे महायुतीच्या उमेदवारासाठी लातूरमध्ये आले आहेत. लातूर लोकसभेसाठी महायुतीकडून सुधाकर श्रृंगारे उमेदवार आहेत. तर, महाविकास आघाडीकडून डॉ. शिवाजी काळगे मैदानात आहेत. काळगे यांच्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सभा घेतली होती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!