Headlines

Onion market rate today कांद्याने केला 1173 कोटींचा वांदा, निर्यात बंदीमुळे नुकसान, राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका

Onion market rate today
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Onion market rate today केंद्र सरकारने लादलेल्या कांदा निर्याती वरील बंदीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रातील ६ लाख ९४ हजार ९२९ मेट्रिक टन कांदा निर्यात कमी झाली असून, राज्याचे १,१७३ कोटींचे नुकसान झाले आहे. निर्यातबंदीमुळे देशांतर्गत भाव निम्म्यावर आल्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षातील दोन हंगामात प्रतिएकरी तीन लाखांचा फटका सहन करावा लागला आहे.

Onion market rate today जगातील ६० पेक्षा जास्त देशांमध्ये भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यात महाराष्ट्राचा वाटा ४० टक्के असतो, नाशिक जिल्हा देशातील कांद्याचे आगर समजला जातो.

Onion market rate today

दुष्काळात तेरावा महिना! रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा वाढ.. नवीन दर पहा

कांदा निर्यातीवर वारंवार निर्बंध टाकल्यामुळे निर्यात कमी झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत भाव कोसळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने निर्यात कायम खुली करणे आवश्यक आहे.

देशाचे ६४९ कोटींचे नुकसान

Onion market rate today जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश म्हणून भारताची ओळख आहे. मात्र, वर्षभरात देशातून ८ लाख १७ हजार टन कांदा निर्यात कमी झाली असून, त्यामुळे तब्बल ६४९ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

कांदा निर्यातबंदीमुळे मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात या राज्यांतील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही आर्थिक नुकसान झाले आहे.

Krushisahayak

तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल

मात्र, वारंवार होणाऱ्या निर्यातबंदीचा व्यापाराला मोठा फटका बसत आहे. निर्यातीमध्ये दुप्पट वाढ झाल्याने स्थानिक बाजारपेठेतही कांद्याला चांगला भाव मिळू लागला होता; परंतु २०२३-२४ या वर्षांत आधी निर्यातीवर शुल्क लावणे, तसेच निर्यातबंदी केल्यामुळे वर्षभरात निर्यात घटून १,८७५ कोटींवर आली. गतवर्षीच्या तुलनेत राज्याची निर्यातीमधील उलाढाल १,१०० कोटींनी कमी झाली.

निर्यातबंदी काळात ‘एनसीईएल’ मालामाल

Onion market rate today केंद्र सरकारने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्यावर निर्यातबंदी लावली व ३१ मार्च २०२४ पूर्वीच मुदतवाढ दिली होती. एनसीईएलच्या माध्यमातून १७ फेब्रुवारीपासून कांदा निर्यातीचा निर्णय “घेतला. एनसीईएलने अडीच महिन्यांत २०० टन कांदा निर्यात करीत तिप्पट नफा कमावला. या काळात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे, खासगी निर्यातदारांचे प्रचंड नुकसान झाले.

Krushisahayak

सोयाबीन शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार, कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा; पैसे जमा होण्याची तारीखही सांगितली

एनसीईएल (नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्स्पोर्ट लिमिटेड) या केंद्रसरकारच्या कंपनीने अडीच महिन्यांत ४,५५० मेट्रिक टन कांदा दुबईत व १,६५० मेट्रिक टन बांगला देशात निर्यात केला. हा कांदा ऑनलाइन निविदाद्वारे विशिष्ट कंपनीच्या माध्यमातून खरेदी केला. कंपनीने कमी दराचा कांदा घेतला व अधिक दराने एनसीईएलला विकला.

एनसीईएल याच कांद्याची ऑनलाइन निविदाद्वारे अधिक दराने विक्री केली. निर्यातबंदीमुळे खासगी निर्यातदारांचा व्यवसाय पाच महिने बंद होता. एनसीईएलने अडीच महिन्यांत ८३.३४ लाख ते ९५.२४ लाख डॉलर कोरा नफा कमावला. रुपयांमध्ये हा नफा ७० ते ८० कोटी रुपये होता.

४० टक्के कमी दरात विक्री

Onion market rate today दुबईत कांद्याचे दर ८४ हजार रुपये प्रति न असताना एनसीईएलने ठराविक एजंटव्दारे बाजार भावापेक्षा ४० टक्के कमी म्हणजेच ५० हजार ४०० च्या दराने कांदा विकला.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!