Cotton Farming 2,777 कोटींचा फटका; तरी ही यंदा कापूसच ?

cotton farming
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Farming नगदी पीकम्हणून जिल्ह्यात सर्वाधिक कापसाचेपीक घेण्यात येते. मात्र, कापसाचे भाव गडगडल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २,७७७ कोटी रुपयांचा फटका बसला आहे. तरी यंदाही जिल्ह्यातील कापसाचा पेरा कायम राहिल, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर वगळता अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी कापसाला पर्यायी पीक म्हणून सोयाबीनला जवळ केले. अन्य पिकांच्या तुलनेत कापसाचा उत्पादन खर्च अधिक असतो. सन २०२२ मध्ये कापसाला १० ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला होता. हाच भाव यावर्षीही राहील, असे गृहीत धरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ३ लाख ९४ हजार २६८ हेक्टर कापसाची लागवड केली होती. एकूण पेरणी पात्र क्षेत्राच्या हे ८४ टक्के क्षेत्र आहे. गतवर्षी संतत धार आणि अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन घटले आहे.

Krushisahayak

कापसाचा फास

उत्पादन खर्च मात्र वाढला होता. शिवाय कापसाचे भाव सतत घटत असल्याने शेतकऱ्यांनी आता घरातील कापूस विक्री करण्यास सुरुवात केली. आता कापसाचे दर प्रतिक्विंटल ७ हजार २०० रुपयांपर्यंत घसरले आहे. गतवर्षी सरासरी दहा हजारांपेक्षा अधिक दराने कापूस विक्री झाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिक्विंटल ३ हजारांचे नुकसान झाले. जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल २,७७७ कोटी ४४ लाख ३२ हजार रुपयांचा फटका बसला असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

Krushisahayak

कापूस अजून घरात आणि नवे वाण आले बाजारात

सरासरी हेक्टरी ८ क्विंटल

गतवर्षी झालेल्या अतिवृष्टी आणि संततधार पावसामुळे जिल्ह्यातील कापसाची उत्पादकता घटली आहे .जिल्ह्यात कोरडवाहूत हेक्टरी ८ क्विटल, तर बागायती जमिनीवरील कापसाचे उत्पादन सरासरी २० ते २२ क्विंटल झाले आहे.

बिघडले त्यांचे गणित Cotton Farming

दर घसरल्याने कापसाने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवले आहे. कापसाच्या भरवशावर काहींनी त्यांच्या मुलींच्या लग्नाचे नियोजन केले होते तर काहींना नवीन घर बांधणे अथवा विहीर खोदण्याचे काम करायचे होते.

मात्र, दर कमालीचे खाली आल्याने शेतकऱ्यांच्या योजनांवर पाणी फेरले गेले आहे.

Panchayat Samiti Yojana 2023 :पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात

Farmers Corner शेतकऱ्यांना मिळाले कमाईचे नवे साधन !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!