MSRTC Bus आषाढी यात्रेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी धावणार लालपरी

msrtc bus
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Bus लातूर विभागाच्या १०२ बसेस पंढरपूरसाठी. आषाढी एकादशी निमित्त श्री क्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने लातूर विभागातून १०२ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

२५ जून ते ५ जुलै दरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. वारकऱ्यांच्या मागणीनुसार माउलींच्या रिंगण सोहळ्यासाठी ही विशेष बस सोडण्याचे नियोजन लातूर विभागाचे आहे.

Krushisahayak

सविस्तर माहिती पहा.

पंढरपूर यात्रा आरामदायी आणि सुखरूप

लातूर विभागाच्या लातूर, निलंगा, उदगीर, औसा आणि अहमदपूर या पाच आगारातून पंढरपूर यात्रेसाठी बसेस सोडल्या जाणार आहेत. १०२ बसेसचा १ लाख ८५ हजार ५४० किलोमीटरचा प्रवास होणार आहे. त्यातून महामंडळाला ८९ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. शिवाय ,वारकऱ्यांच्या मागणीनुसार गाडी सोडण्याचे नियोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे. पंढरपूर यात्रा आरामदायी आणि सुखरूप होण्यासाठी महामंडळाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती विभागीय निरीक्षक अभय देशमुख यांनी दिली.

Krushisahayak

102 विशेष बसेसचे नियोजन

यात्रा बसेसला सवलतीच्या सर्वच योजना लागू MSRTC Bus

बार्शी-पंढरपूर, तुळजापूर-सोलापूर, निलंगा-सोलापूर -पंढरपूर, उदगीर-लातूर-सोलापूर-पंढरपूर या मार्गावरून वारकऱ्यांसाठी पंढरपूर यात्रा बसेस धावणार आहेत. या बसेसच्या आगार निहाय नियोजन करण्यात आले आहे. यात्रा बसेसला सवलतीच्या सर्वच योजना लागू आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना, महिलांसाठी सन्मान योजना, दिव्यांगव अपंगांसाठी सवलत योजनांसह ज्या म्हणून महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी योजना लागू केल्या आहेत.

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मोठी भरती, 8वी, 10वी उत्तीर्णांना संधी

Farmers Corner शेतकऱ्यांना मिळाले कमाईचे नवे साधन !

ST Travel Pass Scheme 2023 :पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास फक्त 1100 रुपयात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!