Headlines

What are the demands of farmers 2023 कर्जमाफी नको, सबसिडी नको फक्त शेतात जाण्यासाठी रस्ता द्या, अमळनेरच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

What are the demands of farmers
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

What are the demands of farmers ‘मुख्यमंत्री साहेब, आम्हाला तुमची कर्जमाफी नको, की सबसिडी नको, फक्त आम्हाला आमच्या शेतात जाण्या येण्यासाठी रस्ता द्यावा, अशी मागणी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कलाली गावातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आमची मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही मतदानावर बहिष्कार करू असा इशारा देखील या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) दिला आहे. 

What are the demands of farmers आजही महाराष्ट्रातील अनेक भागात रस्ते सोयी सुविधा नसल्याचे वास्तव अनेकदा समोर आपले आहे. नाशिकसह (Nashik) नंदुरबार, धुळे (Dhule) आदी जिल्ह्यातही रस्त्याअभावी अनेक भागातील नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. रस्ता नसल्याने डोलीतून गर्भवती महिलासंह रुग्णांना आणण्याची वेळही अनेक गावकऱ्यांवर आली आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) येथील कलाली गावातील शेतकऱ्यांना रस्ता नसल्याने अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे. त्यामुळे येथील गावकऱ्यांनी सुरवातीला स्थानिक प्रशासनाला पत्र लिहूनही काही झाले नसल्याने आता थेट मुख्यमंत्र्यांकडे रस्ता देण्याची तोंडी मागणी केली आहे. शिवाय मागणी मान्य न केल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे हे गाव चर्चेत आलं आहे. 

What are the demands of farmers

जुना 7/12, जुने फेरफार नोंदवही आणि प्रॉपर्टी डाउनलोड करा एका क्लिक वर…

शेत रस्तेही महत्वाचे

शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना सरकार राबवित असले तरी शेत रस्तेही तितकेच महत्वाचे आहेत. गावातील शेत रस्ते व्यवस्थित नसले की शेतात माल पिकून सुध्दा शेतकऱ्यांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील कलाली गावात पाहायला मिळते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा केला जात असताना आमच्या गावात अद्यापही शेत रस्ते होऊ शकले नसल्याने, पावसाळ्याच्या दिवसात आमच्या शेतात जाता येत नाही की पिकविलेला माल घरी आणता येत नाही, शेतात पिकविलेला माल घरी आणण्यासाठी एक ट्रॅक्टर ओढण्यासाठी त्याला अजून दोन ट्रॅक्टर जोडावे लागत आहेत, त्यामुळे तीन पट खर्च वाढत आहे. 

Krushisahayak

आता मागेल त्याला मिळेल विहीर, ऑनलाइन अर्ज सुरू…

अन्यथा मतदानावर बहिष्कार What are the demands of farmers

पालकमंत्र्यांनी रस्ता करण्याचे आश्वासन दिले आहे, तर मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी ही एक किमी रस्ता करून दिला असला तरी अजून तीन किमी रस्ता बाकी असल्याने, मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आता शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे साद घालत रस्त्याची मागणी केली आहे. आम्हाला काही नको, ना योजना, नको, सबसिडी नको, कर्जमाफी नको, फक्त तेवढा रस्ता करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घ्यावी आणि शेत रस्त्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत, आमच्या मागण्या मान्य न झाल्यास मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा ही या शेतकऱ्यांनी दिला आहे

1.बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या

2.पशुपालन लोन योजना 2023; जानिए गाय, भैंस के लिए लोन कैसे लें

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!