Headlines

Stand Up India Loan Scheme बिझनेस सुरु करण्यासाठी मिळणार 1 कोटीपर्यंतचं कर्ज, कसा कराल अर्ज जाणून घ्या

Stand Up India Loan Scheme
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Stand Up India Loan Scheme: स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल आवश्यक असतं. त्यामुळे अनेक जण कर्जासाठी वणवण हिंडतात. बँकांचे उंबरठे झिजवून अनेकदा हाती काहीच लागत नाही. जर तुम्हाला बिझनेस सुरु करण्यासाठी भांडवल हवं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारच्या योजनेनुसार 10 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज मिळू शकते.

देशातील नवोदीत व्यावसायिकांना पाठबळ देण्याासाठी Stand Up India Scheme सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला 1 कोटीपर्यंतचे कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात. योजनेंतर्गत देशभरातील बँकांना सरासरी एका SC/ST वर्गाला आणि एका महिलेला हे कर्ज द्यायचे आहे. या कर्ज योजनेबद्दल जाणून घेऊया.

Stand Up India Loan Scheme

या योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज दाखल करू शकता. तुम्हाला 10 लाख ते 1 कोटीपर्यंत भांडवल मिळू शकतं. कर्ज फेडण्याचा कालावधी सात वर्षे इतका आहे. त्याचबरोबर 18 महिन्याचा मोरेटोरियम पिरियड मिळतो. यातून क्रेडिट विथड्रॉल करण्यासाठी RuPay डेबिट कार्ड दिलं जातं. या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी बँक ब्रांच किंवा लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर किंवा स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया पोर्टलवर अर्ज करू शकता. 

Stand Up India Loan Scheme

या योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज दाखल करण्यासाठी येथे क्लिक करा.

कोण अर्ज करू शकतं

 • या योजनेसाठी फक्त एक महिला किंवा SC/ST वर्गातील व्यक्ती अर्ज करू शकतात. कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
 • कंपनी प्रायव्हेट लिमिटेड किंवा पार्टनरशिप फर्म असणे आवश्यक आहे.
 • कंपनीची उलाढाल 25 कोटींपेक्षा जास्त नसावी. तसेच कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेकडे कोणतीही थकबाकी नसावी.
 • ग्रीनफिल्ड प्रकल्पावर (उत्पादन किंवा सेवा क्षेत्रांतर्गत कोणताही नवीन प्रकल्प) काम करणाऱ्या कंपनी/ फर्म/ संस्था/ व्यक्ती यांना सरकार कर्ज देईल.
 • यासाठी कंपनीला औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळायला हवी होती.
 • कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे फर्ममध्ये 51 टक्के हिस्सेदारी आणि नियंत्रण असावे.
Krushisahayak

बातमी वाचा- देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेला 4 दिवसांत 1 लाख कोटी रुपयांचे नुकसान, काय आहे कारण?

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • पासपोर्ट आकाराचा फोटो
 • पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्सची छायाप्रत.
 • रहिवासी प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र
 • भागीदारी फर्म असल्यास, भागीदारी कराराची कागदपत्रे.
 • भाडे करार
 • मागील तीन वर्षांची बॅलेंस शीट
 • नेट असेट आणि लायबिलिटी तपशील
 • बँकेने आणखी काही कागदपत्रे मागितल्यास देणं आवश्यक
Krushisahayak

बातमी वाचा- आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

पोर्टलवरून अर्ज करण्याची पद्धत

 • सर्वात आधी स्टँड-अप इंडिया लोन स्कीम Stand Up India Loan Scheme च्या पोर्टलवर जाऊन https://www.standupmitra.in/ लिंकवर क्लिक करा.
 • त्यानंतर “Click here for Handholding Support or Apply for a loan” ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
 • तीन पर्याय दिसतील, ज्यामध्ये तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही नवीन उद्योजक आहात, आधीच उद्योजक आहात की स्वयंरोजगार व्यावसायिक आहात? यापैकी एक पर्याय निवडा.
 • आता तुमचे नाव, ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर टाका आणि जनरेट OTP पर्यायावर क्लिक करा. OTP आल्यावर ते एंटर करा.
 • आता तुम्हाला रजिस्टर वर क्लिक करावे लागेल. येथे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला तुमचे लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकावे लागतील.
 • लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला एक अर्ज दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला विनंती केलेले सर्व तपशील भरावे लागतील आणि ते सबमिट करावे लागतील.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी असा करा अर्ज, उपचारासाठी पैसे मिळवा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!