Krushisahayak

Vanyaprani Nuksan Bharpai वन्यप्राण्याच्या हल्ल्यामुळे होणारा मनुष्य मृत्यू अपंगत्व गंभीर जखमी किरकोळ जखमी अशा बाबी करता राज्य शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे. या संदर्भातील एक महत्त्वाचा 3 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

Vanyaprani Nuksan Bharpai 

Vanyaprani Nuksan Bharpai राज्यांमध्ये शेतकऱ्यांचा नागरिकांचा वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, ओला, मगर, हत्ती, नीलगाय, माकड किंवा वानर यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू होतो. बऱ्याच वेळा यांच्या हल्ल्यामध्ये मनुष्य किरकोळ किंवा कायम अपंग किंवा गंभीर जखमी होतात. अशा परिस्थितीमध्ये दिली जाणारी नुकसान भरपाई हे अत्यल्प असल्यामुळे नागरिकाची नुकसान भरपाई होत नाही. असे हे सर्व परिस्थितीमध्ये वेळोवेळी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करावे अशा प्रकारची मागणी शासनाकडे केली जात होती.

शासन निर्णय जाहीर

  • 3 ऑगस्ट 2023 रोजी एक शासन निर्णय निर्गमित करून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
  • ज्यामध्ये अशा प्रकारच्या वन्यप्राण्यामुळे व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या वारसाला 25 लाख रुपयांचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
Vanyaprani Nuksan 

अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Vanyaprani Nuksan Bharpai दिल्या जाणारे अर्थसहाय्य

  • व्यक्तिमत्ते पावल्यास रुपये 25 लाख अर्थसहाय्य रक्कम
  • .व्यक्तीला कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास रुपये 7 लाख 50 हजार अर्थसहाय्य रक्कम.
  • व्यक्ती गंभीर रित्या जखमी असल्यास पाच लाख रुपये अर्थसहाय्यक रक्कम.
  • व्यक्ती किरकोळ जखमी असल्यास औषध उपचारासाठी येणारा खर्च देण्यात यावा मात्र खाजगी रुग्णालयात औषधी उपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये 50 हजार रुपये प्रति व्यक्ती अशी राहील.
  • शक्यतो औषध उपचार शासकीय जिल्हा परिषद रुग्णालयात करावा.

कृषी याांत्रिकीकरण योजनांची लॉटरी सायकल 9 मधील लाभार्थी यादी.

  • Vanyaprani Nuksan Bharpai यामध्ये 10 लाख रुपयांची रक्कम ही तात्काळ डीबीच्या द्वारे दिली जाईल.
  • उर्वरित दहा लाख रुपयांचे रक्कम हे पाच वर्षाचे मुदत ठेव आणि उर्वरित पाच लाख रुपयाची रक्कम हे दहा वर्षाची मुदत ठेव अशा स्वरूपामध्ये त्या वारसाला मिळणार आहे.
  • एकंदरीत दहा वर्षानंतर पूर्ण पंचवीस लाख रुपयांचे रक्कम हे त्या व्यक्तीच्या वारसाला मिळणार आहे.
  • एखाद्या व्यक्तीचा अशा प्रकारच्या वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये कायम अपंगत वाल्यास त्या व्यक्तीला 7.5 लाख रुपयांचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • व्यक्ती गंभीरपणे जखमी झाल्यास त्या व्यक्तीला 5 लाख रुपयाचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषध येणारा खर्च हा पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
  • ज्यामध्ये औषध उपचार हा शासकीय किंवा जिल्हा परिषद रुग्णालयामध्ये करावा अशा प्रकारच्या सूचना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे.
  • परंतु जर शासकीय किंवा जिल्हा परिषदेच्या रुग्णालयामध्ये हा उपचार जर झाला नाही तर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी जास्तीत जास्त 50 हजार रुपयांचे नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
  • नुकसान भरपाईमध्ये अश्याप्रकारे बदल करण्यात आलेला आहे.
  • जेणेकरून या नुकसानग्रस्तांना बाधितांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d