Financial Changes नवा महिना सुरू होताच दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. १ ऑगस्ट २०२३ पासून काही वित्तीय बदल होत आहेत. याबदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे. आयकर विवरणपत्रांसह जीएसटी व क्रेडिटकार्ड पेमेंटशी संबंधित नियमांचा यात समावेश आहे. चला तर ऑगस्टमध्ये होणाऱ्या बदलांबाबत जाणून घेऊ या.
जीएसटी नियम
GST१ ऑगस्टपासून ५ कोटी रुपयांपेक्षा ०% अधिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांना इलेक्ट्रॉनिक इन्व्हॉईस देणे बंधनकारक असेल. त्यामुळे या व्यावसायिकांनी याबाबत जाणून घ्यावे.

सरकारच्या कर्मचार्यांचा महागाई भत्त्या बाबत मोठी अपडेट ?
आयकर विवरणपत्र
३१ जुलैच्या आत आयकर विवरण पत्र न भरणाऱ्या करदात्यांना १ ऑगस्टपासून विलंब शुल्क भरावे लागेल. ५ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना ५ हजारांपर्यंत शुल्क आकारले जाईल.
बँक सुट्ट्या Financial Changes
ऑगस्टमध्ये बँकांदेशाच्या विविध भागांनुसार १४ दिवस सुट्ट्या राहतील. यात शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज
स्वयंपाकाचा गॅस
Financial Changes प्रत्येक महिन्याच्या १ व १६ तारखेला स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीचा आढावा तेल वितरण कंपन्यांकडून घेतला जातो. १ ऑगस्ट रोजीही त्यानुसार बदल होईल. पीएनजी व सीएनजीच्या दरातही बदल होऊ शकतो.
क्रेडिट कार्ड कॅशबॅक
अॅक्सिस बँक व फ्लिपकार्टच्या माध्यमातून क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास खिशावर भार पडणार आहे. १२ ऑगस्टपासून कॅशबॅक कमी होणार आहे.
Government Health Insurance Scheme 2023 :आभा हेल्थ कार्ड मोबाईल मधून काढा मिनिटात
One Response