Maharashtra Shikshak Bharti राज्यातील शाळा आणिकनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकआणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू झालीआहे. येत्या तीन महिन्यात २४ऑक्टोबरपर्यंत शिक्षक भरतीचीप्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकरयांनी मंगळवारी विधान परिषदेतकेली. यावेळी त्यांनी भरती प्रक्रियेचाकार्यक्रमही जाहीर केला.
शिक्षक सदस्य सुधाकर अडबालेयांनी शिक्षक भरतीबाबत तारांकितप्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षक भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वाधिकारे दखल घेत स्थगिती दिली होती. न्यायालयाने ही स्थगिती उठविली असून शिक्षक भरती सुरू झाली आहे. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

असा आहे भरती कार्यक्रम/निवृत्त शिक्षकांची भरती कायमस्वरुपी नाही
7 Responses