Farmers Corner वर्षभराची खेप म्हणून शेतकरी मोठ्या अपेक्षेने महागड्या बियाणांची खरेदी करून पेरणी करतो. मात्र, दरवर्षी अनेक कंपन्यांकडून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येते. यंदाअद्याप खरिपाची पेरणी पूर्ण झालीनसली तरी आतापर्यंत बोगसबियाणांच्या १०८५ तक्रारी राज्यभरातूनआल्या आहेत. यापैकी बहुतांश तक्रारीया कापूस आणि सोयाबीन बियाणांच्याआहेत. त्यापैकी ९२७ पंचनामे झालेआहेत, तर एकूण ९९४८ बोगसबियाणांच्या बॅग जप्त करण्यात आल्याआहेत. ४२ जणांवर गुन्हे दाखलकरण्यात आले आहेत.

बळीराजाशी गद्दारी थांबणार तरी कधी?