Headlines

Pik Nuksan Bharpai 2023 :असा राहील वाटपाचा निकष

Pik Nuksan Bharpai
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pik Nuksan Bharpai

Pik Nuksan Bharpai याआधी सततच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निकषाशिवाय ७५० कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर मदतीसाठी राज्य सरकारने निकष ठरविले होते. मात्र, ठरवलेल्या निकषात अनेक शेतकरी बसत नसल्याने निकष शिथिल करून सुधारित दरांनुसार मदत देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याअगोदर निकषात बसलेल्या ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे त्यांना वाढीव सुधारित दरातील फरकाची भरपाईदेखील दिली जाणार आहे.

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, निकष शिथिल करून सुधारित दराने देणार पिकांची भरपाई

 • महसुली मंडळात २४ तासांत ६५ मि.मी. पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास अतिवृष्टी समजण्यात येते. त्यानुसार पंचनामे करण्यात येतात.
 • मात्र, अतिवृष्टी न होताही सततच्या पावसामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे काही गावांमध्ये सतत पाऊस पडल्याने अतिवृष्टीच्या निकषात बसत नसतानाही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळल्यास विशेष बाब म्हणून मदत देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते.
 • मात्र, मदत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष होता.
Pik Nuksan Bharpai

धान्या एवजी मिळणार पैसे

अशी मिळणार सुधारित मदत

 • Pik Nuksan Bharpai जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी दोन हेक्टरच्या मर्यादित ६,८०० प्रतिहेक्टरऐवजी ८ हजार ५०० रुपये.
 • बागायत पिकांच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० प्रतिहेक्टर वरुन १७ हजार रुपये प्रतिहेक्टर.
 • बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरऐवजी २२ हजार ५०० रुपये प्रतिहेक्टर (दोन हेक्टरच्या मर्यादित).

Pik Nuksan Bharpai नियम शिथिल

 • सततच्या पावसासाठी तयार केलेल्या निकषात शिथिलता देऊ नये, असे मदत नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा समितीने सुचविले होते,
 • मात्र, याआधी निकषाशिवाय मदत वितरित झाल्याने यापुढील मदत निकषानुसार वितरित केल्यास रोष निर्माण होऊ शकतो, अशी सरकारला भीती आहे.
Krushisahayak

शेत रस्ता मागणी अर्ज

तिजोरीवर १,२७२ कोटींचा बोजा

 • Pik Nuksan Bharpai चालू आर्थिक वर्षात ६,२४७.३० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून, आतापर्यंत १६.५५ कोटी निधी वितरित झाला आहे.
 • सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाच्या नुकसानीकरिता दोन हेक्टरच्या मर्यादित मदत देण्यात येणार आहे.
 • त्यामुळे राज्य सरकारवर १,२७२ कोटी २२ लाख ४१ हजार रुपयांचा भार पडणार आहे, ४८७ महसूल मंडळांपैकी केवळ १५ मंडळांकरिता निधी वाटप करावयाचा झाल्यास उर्वरित शेतकऱ्यांकडून मदतीबाबत रोष निर्माण होऊ शकतो,
 • असे मत बैठकीत व्यक्त झाले. त्यामुळे २०२२ च्या पावसाळ्यात राज्य
 • आपत्ती प्रतिसाद निधीनुसार २ हेक्टर मर्यादित मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Maulana Azad Education Foundation :मोदी सरकार मुलींना देणार 51 हजार रुपये

Sheli/Kukut Palan Shed Yojana 2022 :शेळीपालन / कुक्कुटपालन शेड अनुदान

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!