Sitafal Rate गुलटेकडी मार्केटमध्ये सीताफळाची पुणे परिसरातील पुरंदर, वडकी या भागांतून मोठ्या प्रमाणात आवक होते. या भागांत शेकडो हेक्टरवर सीताफळाच्या फळबागा आहेत. यंदा वडकी येथील श्री. फाटे यांनी योग्य पद्धतीने नियोजन केले होते. त्यानुसार पहिली तोडणी शनिवारी (ता. २७) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुणे मार्केटमध्ये फळ व्यापारी युवराज काची यांच्याकडे विक्रीसाठीआणला होता.
Table of Contents
मार्केटमध्ये सीताफळाची प्रतवारी करून दोन कॅरेट आणले होते. एका कॅरेटमध्ये एक नंबरचा १५ किलो, तर दुसऱ्या कॅरेटमध्ये दोन नंबरचा ९ किलो असा एकूण२४ किलो माल विक्रीसाठी आणला होता. एकनंबरच्या मालाला प्रति किलो ३६० रुपयांचादर मिळाला. तर दोन नंबरच्या मालाला प्रतिकिलो १०० रुपयांचा दर मिळाला आहे. मार्केटमध्ये आवक वाढण्याची शक्यता आहे.
Weather Update मान्सूनचा नवा अंदाज ; उशिरा पण चांगला येणार
मार्केटमध्ये आलेल्या फळाची वैशिष्ट्ये
एक नंबर सीताफळांचे २०० ते४०० ग्रॅम वजन.
दोन नंबर सीताफळांचे ५० ते१५० ग्रॅम वजन.
विषमुक्त असल्याने खाण्यासाठी चवीला चांगली.
गराचे प्रमाण चांगले, टिकवण क्षमता अधिक मागणी चांगली
सीताफळ उत्पादक शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया Sitafal Rate
माझ्याकडे सीताफळाचे अडीच एकरावर ७०० झाडे आहेत. ही सर्व झाडे पुरंदर गावरान वाणाची आहेत. मी स्वतः अकरा वर्षांपासून उत्पादन घेत आहे. दरवर्षी नियोजन करत असतो. आतापर्यंत मी घेतलेल्या उत्पादनाला उच्चांकी असा दर मिळाला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये माझ्या मालाची चांगलीच चर्चा झाली.- शशिकांत फाटे, सीताफळ उत्पादक शेतकरी.
PM Kusum Solar Yojana शेतकऱ्यांसाठी खुशखबर, आता सर्वाना मिळणार सोलर, कधीही करा अर्ज
यंदा हंगामातील पहिल्यांदाच रविवारपासून सीताफळाची आवक झाली आहे. सुरुवातीला आवक कमी असते. त्यामुळे मार्केटमध्ये आलेल्या सीताफळाला प्रति किलोला सर्वाधिक दर मिळाला आहे. येत्या काळात चांगली आवक होईल. त्यामुळे दरात काहीशी घट होईल.-युवराज काची, फळव्यापारी, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन, पुणे
One Response