Headlines

POCRA 2.0 : भागधारकांच्या मतानुसार होणार पोकरा-२ची अंमलबजावणी

POCRA 2.0
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

POCRA नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाची दुसऱ्या टप्प्यात अंमलबजावणी होणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव देखील जागतिक बॅंकेला पाठविण्यात आला असून कर्ज मंजुरीची प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जाते.

त्यापार्श्‍वभूमीवर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणत्या घटकांच्या अंमलबजावणीवर भर दिला पहिजे, हे जाणून घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्याअंतर्गंत राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकांशी पहिल्या टप्प्यात संवाद साधण्यात आला.

POCRA 2.0

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस सुरवात

हवामान संवेदनशील गावांमध्ये व्यवसायिक पीकपद्धतीला प्रोत्साहन त्या माध्यमातून आर्थिक समृद्धी हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ, मराठवाड्यातील गावांचा समावेश होता. त्यातून व्यापक परिणाम साधता आल्याने आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

त्याकरीता राज्यातील २१ जिल्ह्यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रकल्पाचे कृषी विद्यावेत्ता विजय कोळेकर यांनी दिली. विदर्भातील ११, मराठवाड्यातील आठ तसेच जळगाव खांदेश आणि नाशिक अशा २१ जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे. या जिल्ह्यातून तब्बल ६५०० गावांची निवड प्रकल्पासाठी करण्याचे प्रस्तावीत आहे. POCRA

त्यासोबतच प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात कोणती कामे करावी हे स्टेकहोल्डर्सच्या माध्यमातून जाणून घेण्यावर भर देण्यात आला आहे. त्या अंतर्गंत ऑनलाइन पद्धतीने राज्यातील आत्मा प्रकल्प संचालकांशी संवाद साधण्यात आला.

Krushisahayak

महिला बचत गटांना शेळी गट वाटप

या वेळी आत्मा प्रकल्प संचालकांनी शेतीला जैविक कुंपण असावे अशी मागणी केली. त्याकरीता प्रकल्पात अनुदानात्मक योजना राबवावी, असेही सांगितले. पूर्व विदर्भातील धानपट्ट्यात टसर रेशीम शेती होते. त्याचाही विशेष बाब म्हणून प्रकल्पात समावेशाची मागणी या वेळी करण्यात आली.

दुबार पीकपद्धतीला मिळेल प्रोत्साहन

गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या धानपट्ट्यांतील जिल्ह्यांमध्ये एकच पीक घेतले जाते. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची आर्थिकस्थिती बरी नाही. परिणामी या भागात पोकरा प्रकल्पातून दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी अनुदानात्मक योजना राबविण्याची मागणी या भागातील आत्मा प्रकल्प संचालकांकडून करण्यात आली.

Krushisahayak

Weight Loss Breakfast

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!