Headlines

Bad cibil loan app list 2024 ‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?

Bad cibil loan app list ‘सिबिल’ स्कोअर कसा सुधाराल?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bad cibil loan app list स्वीकारार्ह ‘सिबिल’ स्कोअर असण्याचे महत्त्व आणि फायदे यांचा आढावा (अर्थ वृत्तान्त, ११ मार्च २०२४) घेतल्यानंतर, आता काही कारणांनी ‘सिबिल स्कोअर’ खराब झाल्यास काय उपाययोजना करावी हेही जाणून घेऊ. वाचकांना माहीत असेल की, ‘सिबिल स्कोअर’ ७५० च्या वर असल्यास तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ चांगला समजला जातो. थोडक्यात, तुम्ही एक चांगले कर्जदार असता. जेव्हा तुम्ही कर्ज (किंवा क्रेडिट कार्ड) घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला चांगल्या अटी-शर्तींसह कमी दराने कर्ज मिळू शकते.

जरी तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ ७५०च्या वर असणे आदर्श समजला जात असला तरी प्रत्येक कर्ज प्रदात्याचे निकष वेगळे असू शकतात. तुम्ही तुमच्या ‘क्रेडिट स्कोअर’मध्ये अल्पावधीत सुधारणा करू शकत नाही. तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ ७५० पेक्षा कमी असल्यास, तो कमी का आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे. Bad cibil loan app list

या लेखाद्वारे तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ कसा सुधारावा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

१. तुमचा सिबिल स्कोअर कमी असण्याच्या कारणांच्या तपासाला सुरुवात करण्यासाठी, तुम्ही तुमचा ‘क्रेडिट रिपोर्ट’ तपासून पाहायला हवा. तुमचा क्रेडिट स्कोअर त्वरित वाढवण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या स्कोअरवर नकारात्मक परिणाम करणाऱ्या बाबीचे पुनरावलोकन करणे. यासाठी तुमच्या क्रेडिट रिपोर्टची वार्षिक एक प्रत तुम्हाला मोफत मिळते, तुमचा स्कोअर कमी असण्यास तुमच्या क्रेडिट हिस्ट्री अर्थात अहवालात काही विसंगती कारणीभूत असू शकतील. या विसंगतीचे निराकरण करणे शक्य असेल तर या विसंगतीचे निराकरण केल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर सुधारू शकतो. काही ग्राहकांनी त्यांच्या वैयक्तिक तपशिलांशी संबंधित चुका शोधून त्यात सुधारणा केल्याने क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत झाली आहे.


२. तुम्ही फार पूर्वी फेडलेल्या कर्जासाठी आणि अनाकलनीय खात्यांसाठी तुमच्या अहवालांची तपासणी करा. यात काही त्रुटी असतील त्या त्रुटींचे निराकरण करा. Bad cibil loan app list
३. मोठी कर्जे फेडा आणि तुमच्या क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण कार्ड मर्यादेच्या ३० टक्के किंवा त्याहून कमी सीमित ठेवा.

Krushisahayak

अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस सुरवात

४. तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (ईएमआय) वेळेवर भरा. हप्ता वेळेवर न भरल्यास तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’ घसरू शकतो. जर तुमच्याकडे वाहन, गृहोपयोगी वस्तू किंवा घर अशी मोठी कर्जे असतील तर या कर्जांची परतफेड करण्यास प्राधान्य द्या. तुमच्या क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर भरा. तुमचे क्रेडिट रेटिंग मोजताना सिबिल किंवा इतर क्रेडिट ब्युरो ज्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देतात त्यापैकी क्रेडिट कार्डाचे हप्ते हे महत्त्वाचे मोजमाप आहे. Bad cibil loan app list


५.तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये तुमच्या घरगुती वापराची बिले (वीज, पाणी, गॅस किंवा फोन) भरण्याची माहिती अंतर्भूत नसली तरीही, ही बिले देय असताना अदा करणे महत्त्वाचे आहे. या सेवांचे मूल्य वेळेत न दिल्यास तुमचा कर्ज प्रदाता तुमचे कर्ज एखाद्या वसुली वितरकाकडे पाठवू शकतो. त्यांना तुमच्या क्रेडिट अहवालावर ‘डिफॉल्ट रेकॉर्ड’ करण्यास सांगू शकतो.
६. क्रेडिट कार्डच्या वापराचे प्रमाण (क्रेडिट युटिलायझेशन रेशो) कमी ठेवा.

प्रत्येक खरेदी केलेल्या गोष्टीसाठी क्रेडिट कार्ड वापरू नका. क्रेडिट कार्डचे पत वापर प्रमाण (क्रेडिट युटिलायझेशन रेशो) ३० टक्के किंवा त्यापेक्षा कमी ठेवणे कधीही चांगले. म्हणजेच जर तुमची कार्ड वापर मर्यादा १ लाख रुपये असेल तर ३० हजारांच्या वर त्याचा वापर जाऊ न देणे कधीही हिताचे असते. असे केल्याने तुमच्या सिबिल किंवा क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम होईल. तुमची मासिक देय शिल्लक कमी ठेवल्यास सुदृढ सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर दिसून येईल. Bad cibil loan app list

Krushisahayak

Weight Loss Breakfast

७. जेव्हा तुम्ही तुमच्या बँकेला तुमची क्रेडिट मर्यादा वाढवण्यास सांगता, विशेषत: क्रेडिट कार्डसाठी, याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करण्याची संधी मिळेल. जर तुम्ही तुमचा वापर चतुराईने व्यवस्थापित केले तर क्रेडिट मर्यादेतील या वाढीमुळे अनेक ‘प्लस पॉइंट्स’ मिळू शकतात. Bad cibil loan app list

तुमच्याकडे खूप जास्त क्रेडिट उपलब्ध आहे आणि तुम्ही तुमचा क्रेडिट वापर कमी ठेवल्यास, त्याचा तुमच्या सिबिल किंवा क्रेडिटवर सकारात्मक परिणाम होईल. संयुक्त अर्जदारांवर लक्ष ठेवा. ही खरोखर अशी परिस्थिती आहे जिथे तुमची चूक नसली तरीही तुम्हाला त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दुसऱ्याने घेतलेल्या कर्जासाठी संयुक्त अर्ज करत असाल आणि त्यांनी बिल उशिरा दिले असेल तर तुमचेही नुकसान होईल. ते तुमच्या अहवालातही दिसून येईल आणि सिबिल किंवा क्रेडिट स्कोअरवर विपरीत परिणाम होऊ शकेल. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कर्ज आणि कार्डे वेळेवर भरली जात आहेत याची खात्री करणे आणि संयुक्त क्रेडिट अटीसाठी अर्ज करण्यापुरते मर्यादित ठेवणे.

८. तुमचे कर्ज फेडण्यासाठी तुमच्याकडे रोख रक्कम नसल्यास, तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत:

-शिल्लक हस्तांतरण क्रेडिट कार्डसाठी अर्ज करा. तुमचे जुने कर्ज नवीन बॅलन्स ट्रान्सफर क्रेडिट कार्डवर हलवण्याचा विचार करा. Bad cibil loan app list
क्रेडिट लाइन वाढवण्याची विनंती करा. तुमचा क्रेडिट रेशो त्वरित वाढवण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तुमची क्रेडिट लाइन वाढवणे. जर -तुम्ही वेळेवर पैसे भरत असाल आणि कर्जदाती संस्थेशी तुमचे संबंधही चांगले असायला हवेत. क्रेडिट लाइन वाढीचा तुमच्या वापर मर्यादेवर (युटिलायझेशन रेशो) कर्ज फेडण्याइतकाच सकारात्मक परिणाम होईल.

Krushisahayak

रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील मोठ्या बँकेवर बंदी; ग्राहकांना पैसे काढण्यासही निर्बंध

-कर्ज एकत्रीकरणाचा विचार करा. तुमचे फिरणारे छोटी छोटी कर्जे एकाच कर्जामध्ये एकत्रित करून, तुम्ही तुमची क्रेडिट कार्ड शिल्लक काढून टाकाल. तसेच, एक हप्ता कर्ज तुमच्या क्रेडिट वापराच्या गुणोत्तरामध्ये समाविष्ट केले जात नाही कारण ते कर्ज फिरवत नाही. Bad cibil loan app list
-तुमचे क्रेडिट स्कोअर सुधारण्यासाठी सातत्याने निरीक्षण करणे आणि कार्य करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात कराल तितक्या लवकर तुमचे गुण वाढतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!