Headlines

Skill based jobs 2024 नोकरी शोधताय? ‘ही’ पाच कौशल्ये तुमच्याकडे असणं आवश्यक

Skill based jobs 2024 नोकरी शोधताय? ‘ही’ पाच कौशल्ये तुमच्याकडे असणं आवश्यक
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Skill based jobs in 2024

Skill based jobs सध्या जगात कामाचे स्वरूप बदलत चालले आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजंन्स (AI) आणि सतत बदलणारे तंत्रज्ञान, बदललेल्या व्यावसायिक गरजा, ग्राहकांच्या वर्तनात झालेले बदल यामुळे सध्याची कामकाजाची पद्धत ही पूर्णपणे बदललेली आहे.

या सर्व गोष्टींमुळे सध्याच्या परिस्थितीशी जुळवून घेत काम करताना अनेक कर्मचाऱ्यांवर दबाव येत आहे. परंतु, तुम्हाला घाबरून जाण्याची काही गरज नाही. या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी तरूणांना सतत विविध कौशल्ये शिकत रहावी लागतात. Skill based jobs

नोकरी मिळवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या तरूणांना ही कौशल्ये माहित असणे आणि ती समजून घेणे महत्वाचे आहे. हे जर तुम्ही समजून घेतले तर करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल.

Krushisahayak

आरबीआयचा सहकारी बँकांना दणका; 50 लाखांहून अधिकचा ठोठावला दंड

कोणती आहेत ही कौशल्ये? जी तुम्हाला २०२४ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील. चला तर मग जाणून घेऊयात या कौशल्यांबद्दल.

अनुकूलता

सध्याचे जग हे कमालीचे विकसित होत आहे. अगदी कामाच्या पद्धतींपासून ते बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानापर्यंत हे सर्व बदल होत आहेत. या सगळ्यांशी जुळवून घेण्यासाठी लवचिक आणि अनुकूल असणे हे फार महत्वाचे आहे. अनेक कंपन्यांना असे कर्मचारी हवे आहेत की, जे वेळेनुसार हे बदल स्विकारतील आणि नवीन आव्हानांना सामोरे जावू शकतील.

Krushisahayak

घरावर मोफत सोलर पॅनल बसवून मिळवा आयुष्यभर फुकट वीज 2024

या सगळ्यात तुमच्यातील अनुकूलतेचा कस लागणार, हे अगदी खर आहे. तुम्ही जर या सर्व परिस्थितीशी जुळवून घेतले आणि या नव्या बदलांना एक संधी म्हणून स्विकारले तर तुम्ही इतर उमेदवारांपेक्षा वेगळे ठराल. यामुळे, तुमच्यासाठी करिअरच्या अनेक संधी निर्माण होतील. त्यामुळे, करिअरमध्ये अनुकूलता फार महत्वाची आहे आणि हे कौशल्य तुमच्या अंगी असणे फार गरजेचे आहे. Skill based jobs

डेटा साक्षरता आणि विश्लेषण

सध्याच्या काळात डेटा ही जगातील सर्वात मोठी वस्तू बनली आहे. सर्व प्रकारच्या दैनंदिन कामांसाठी आणि कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आपण सर्वजण या डेटावर अवलंबून आहोत.

अगदी लहान ते मध्यम उद्योगांपासून ते भल्यामोठ्या कॉर्पोरेशन्सपर्यंत डेटा वापरण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. या सर्व कारणांमुळेच, अनेक कंपन्या मूलभूत डेटा साक्षरता आणि विश्लेषणात्मक कौशल्ये अवगत असलेल्या तरूणांची कामासाठी निवड करतात.

आता यासाठी तुम्हाला अगदी डेटामधील भरपूर ज्ञान असावे, असे काही नाही. मात्र, तुम्हाला कमीतकमी यातील बेसिक गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे आणि अशा तरूणांची निवड करण्यासाठी कंपन्या प्राधान्य देत आहेत.

Krushisahayak

अण्णासाहेब पाटील महामंडळ 15 लाख बिन व्याजी कर्ज

हे कौशल्य शिकण्यासाठी तुम्ही विविध ऑनलाईन कोर्सेसची मदत घेऊ शकता किंवा विविध प्लॅटफॉर्म्सवर जाऊन याची माहिती गोळा करू शकता. या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर तुमच्या ‘सिव्ही’ (CV) वर याचा उल्लेख अवश्य करा.

कल्पकता

कोणतेही क्षेत्र असो तुम्हाला तिथे तुमची क्रिएटिव्हीटी (कल्पकता) ही दाखवावीच लागते. जर तुम्हाला सध्याच्या काळात तुमच्या नोकरीमध्ये टिकून रहायचे असेल तर कामाप्रती क्रिएटिव्ह असणे हे फार महत्वाचे आहे. अनेक कंपन्या अशाच उमेदवारांची निवड करतात, जे नवीन आयडियाज एक्सप्लोअर करण्यावर भर देतात आणि आव्हानांना तोंड देऊ शकतात.

तुमचे हे कौशल्य दाखवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुम्ही आकर्षक पद्धतीने तुमचा सिव्ही डिझाईन करणे होय. जेणेकरून तुम्ही भूतकाळात केलेल्या कामाचा सकारात्मक प्रभाव पडेल. Skill based jobs

Krushisahayak

4 लाख रुपये अनुदान; मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

तुम्ही विविध प्रकारच्या जॉब वेबसाईट्स, लिंक्डइनवर ही स्वत:च्या कामाचे वेगळेपण दाखवणारी एखादी आकर्षक ओळ लिहू शकता आणि कंपन्यांचे लक्ष वेधू शकता. याचा तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

समस्यांचे निराकारण

तुमच्या कामाचे कोणतेही क्षेत्र असुद्या तिथे काम करताना कोणत्या ना कोणत्या समस्या या येतच राहणार आहेत. मात्र, या समस्या सोडवण्यासाठी आपण कशा प्रकारे प्रयत्न करू शकतो आणि यावर आपण कसे विचार करतो? ही कौशल्ये तरूणांमध्ये नेहमीच शोधली जातात. Skill based jobs

२०२४ मध्ये अनेक क्षेत्रांमध्ये बदल होत आहेत. उद्योग-व्यवसायांचे स्वरूप बदलत आहे आणि नव्या तंत्रज्ञानाचा उदय होत आहे. त्या प्रमाणे कंपन्या तुमच्याकडून तुम्ही भूतकाळात कामाच्या ठिकाणी समस्या कशा सोडवल्या? त्यांचे निराकारण कसे केले? हे तुम्ही त्यांना दाखवून देण्याची अपेक्षा ठेवतील.

काय सांगता! आधार कार्डवर देखील मिळतय लोन, 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

कामाच्या ठिकाणी आलेल्या समस्या सोडवण्यासाठी उमेदवाराने कोणत्या प्रकारे विचार केला? ती परिस्थिती कशी हाताळली आणि त्यातून मार्ग कसा काढला?  आणि समस्या सोडवण्यासाठी उपाय कसा शोधला? याची तार्किक पद्धतीने उत्तरे उमेदवाराला देता आली पाहिजेत. तसेच, नव्याने येणाऱ्या गोष्टी स्विकारता आल्या पाहिजेत.

शाश्वत साक्षरता आणि जागरूकता

हे कौशल्य जरी तुम्हाला वेगळे वाटत असले तरी आजकाल शाश्वततेची मोहिम जगभरातील अनेक व्यवसायांवर आणि उद्योगांवर परिणाम करत आहे. त्यामुळे, २०२४ मध्ये शाश्वत साक्षरता हे सर्वात महत्वाचे कौशल्य बनले आहे.

तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्या समस्या सोडवता, त्यासाठी जे उपाय शोधता ते पर्यावरणाला हानी पोहचवणारे असता कामा नयेत. याची तुम्ही काळजी घेणे गरजेचे आहे. जर या प्रकारे तुम्ही काम केले तर, शाश्वत साक्षरता हे दर्शवते की, तुम्ही पर्यावरण आणि पर्यावरण पद्धतींबद्दल जागरूक आहात.

नविन व्यवसायासाठी मिळणार 1 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज…

सध्याच्या काळात तुम्ही शाश्वत साक्षर असणे फार महत्वाचे आहे. आजकाल अनेक कंपन्या सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी व्यवसाय-उद्योगांवर आधारित विविध प्रकारचे हरित उपक्रम सुरू करत आहेत. त्यामुळे, या शाश्वत साक्षरतेशी तुम्ही अनुकूल आहात. हे सिद्ध करण्याची एक संधी तुम्हाला उपलब्ध होते. Skill based jobs

२०२४ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी ही संपूर्ण सॉफ्ट आणि हार्ड स्किल्सने समाविष्ट असलेली कौशल्ये तुम्हाला अवगत असणे गरजेचे आहे. ही कौशल्ये तुम्हाला या वर्षात नोकरी मिळवण्यासाठी नक्कीच मदत करू शकतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!