Headlines

Jowar price कांद्यानंतर आता ज्वारी, शाळूच्या दरात घसरण; 15 रुपयांनी दर पडले

Jowar price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jowar price मागच्या काही महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता परंतु अचानक या आठवड्यापासून दरात घसरण सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात किलोमागे पाच रुपये, शाळू होलसेल बाजारात १५ रुपये कमी झाले आहेत.

याचबरोबर लाल मिरचीची आवकही चांगली वाढल्याने यंदा दर निम्म्यावर आले आहेत. गोडेतेलाचे दर स्थिर असून, साखर ४२ रुपयांपर्यंत स्थिर आहे. यामुळे बाजारात कांदानंतर आता ज्वारीचे दर पडले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Jowar price

कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

गेल्या सहा महिन्यांपासून ज्वारीला चांगला दर मिळत होता. ज्वारी ४५ ते ६०, तर शाळू ९० रुपये किलोपर्यंत दर पोहचले होते. मात्र, रब्बी हंगामातील पिके चांगली असल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेवर झालेला दिसतो. ज्वारीमध्ये प्रतिकिलो पाच रुपये, तर शाळूच्या दरात पंधरा रुपयांची घसरण झाली आहे.

तूरडाळ, हरभरा डाळ, मसूरडाळीसह इतर कडधान्याच्या दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. शेंगदाणा, साबूदाण्याचे दर स्थिर आहेत. साखरेच्या दरात फारशी वाढ नसली तरी जाडी साखर ४२ रुपये किलो आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ‘ब्याडगी’ मिरची गेल्या वर्षी ६५० रुपये किलो होती, तो दर आता ३०० रुपयांपर्यंत खाली आला आहे. आगामी दोन महिन्यात दरात आणखी घसरण होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.Jowar price

गूळ तेजीत

गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे, आवक चांगली असली तरी दर तेजीत आहे. किरकोळ बाजारात ५० रु. किलो दर आहे.

Krushisahayak

पहा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबवल्या जातात

ज्वारीचे दर प्रतिकिलो असे

वसंत ज्वारी ४०

महिंद्रा ज्वारी ४५

शाळू ७५

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!