Safe money loan app review युजर्सच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारे 18 अ‍ॅप्स Google नं हटवले; तुमच्या स्मार्टफोनमध्ये नाहीत ना हे SpyLoan Apps

Safe money loan app review
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Safe money loan app review युजर्सची सुरक्षेसाठी Google नेहमीच वेगवेगळी पाऊले उचलत असतं. अलीकडेच गुगलनं 18 Spy Loan Apps हटवले होते. हे अ‍ॅप्स प्ले स्टोरवरून लाखो लोकांनी डाउनलोड देखील केले आहेत. सॉफ्टवेयर कंपनी ESET नं ह्याबाबत एक नवीन रिपोर्ट देखील जारी केला आहे. ज्यात सांगण्यात आलं आहे की संशोधनातून १८ अ‍ॅप्स सापडलेत आहेत जे ‘SpyLoan’ अ‍ॅप्स प्रमाणे काम करत आहेत.

हे अ‍ॅप्स युजर्सचा डेटा त्यांच्या नकळत चोरी करत होते. त्यामुळे जर तुमच्या मोबाइलमध्ये देखील हे अ‍ॅप्स असतील तर तुम्ही ते त्वरित अनइन्स्टॉल केले पाहिजेत. कारण ह्या अ‍ॅप्समधून कर्ज घेणाऱ्या युजर्सना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांचा डेटा वापरला जात होता. ह्या डेटाच्या आधारावर युजरला कर्जाची परतफेड करण्यासाठी भाग पाडलं जात होतं आणि जास्त व्याजाची देखील मागणी केली जात होती. Safe money loan app review

Krushisahayak

आता सर्वानाच मिळणार मोबाइल अॅपद्वारे 9 लाखापर्यंत कर्ज

ESET रिसर्चरनं हे अ‍ॅप्स शोधून काढले जे युजर्सची फसवणूक करत होते. हे अ‍ॅप्स आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि साउथ ईस्ट आशियातील युजर्सना टारगेट करत होते. ह्याबाबत जेव्हा गुगलला माहिती मिळाली तेव्हा त्यावर कारवाई करत हे १८ अ‍ॅप्स हटवण्यात आले. आता ज्या युजर्सनी हे अ‍ॅप्स डाउनलोड केले आहेत त्यांनी हे त्वरित हे डिलीट केले पाहिजेत.

कोणते अ‍ॅप्स गुगलनं हटवले?

AA Kredit, Amor Cash, GuayabaCash, EasyCredit, Cashwow, CrediBus, FlashLoan, PréstamosCrédito, Préstamos De Crédito-YumiCash, Go Crédito, Instantáneo Préstamo, Cartera grande, Finupp Lending, ४S Cash, TrueNaira, EasyCash

Krushisahayak

फोन पे ने कमवा रोज 1000 रुपये

जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील हे अ‍ॅप्स असतील तर ते त्वरित डिलीट करा. कारण ह्यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. परंतु हे अ‍ॅप्स किती भारतीयांनी डाउनलोड केलेत ह्याबाबत कोणीतही माहिती रिपोर्टमधून समोर आलेली नाही. तरीही तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये हे अ‍ॅप्स आहेत का ह्याची खात्री करून घेऊ शकता. असे अ‍ॅप्स असल्यास त्यावर टॅप अँड होल्ड करून अनइन्स्टॉल वर क्लिक करा. तसेच तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन अ‍ॅप मॅनेजर मध्ये सिलेक्ट करून तिथून देखील अनइन्स्टॉल करता येतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *