Headlines

dairy farm instructor syllabus 2023 डेअरी फार्ममधील व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी सर्वोत्तम कोर्स

dairy farm instructor syllabus 2023 डेअरी फार्ममधील व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी सर्वोत्तम कोर्स
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

dairy farm instructor syllabus फायदेशीर डेअरी फार्म स्थापित करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे ही एक कला आणि विज्ञान दोन्ही आहे. यशस्वी डेअरी फार्मने शेतकर्‍यांचे भविष्य बदलले आहे आणि वर्षानुवर्षे त्यांच्या संपत्ती मध्ये वाढ केली आहे. दुग्धव्यवसाय हा बहुतेकदा निसर्गाचा अनियमितपणा आणि खाद्य व चाऱ्याच्या किंमतींमधील चढ-उतार यांच्या अधीन असतो.

आजारांचा परिणाम फक्त जनावरांच्या आरोग्यावर होत नाही तर डेअरी फार्मचा नफा व जनावरांची उत्पादनक्षमता यांवरही होतो. दुग्धव्यवसायात शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन केल्यास शहरातील काही नोकऱ्यांमध्ये मिळणाऱ्या उत्पन्नाच्या बरोबरीचे उत्पन्न आपल्याला आपल्या डेअरी फार्ममध्ये मिळते. सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला उद्योजक बनण्याची संधी मिळते व आपण आपले स्वातंत्र्य उपभोगू शकतो.

दुग्धव्यवसायाच्या या ऑनलाइन अभ्यासक्रमामधून आपल्याला सर्वात महत्वाच्या अशा अकरा विषयांबद्दल शिकायला मिळेल. यामध्ये आपण आपला डेअरी फार्म यशस्वी करण्यासाठी विविध वैज्ञानिक प्रक्रिया व तंत्रज्ञान यांचा नियोजनपूर्वक वापर कसा करायचा हे शिकाल.

स्वच्छ दूध निर्मिती dairy farm instructor syllabus – 

अँटीबायोटिक व अफलाटोक्सिनमुक्त दूध कसे तयार करावे, त्याचबरोबर अजून काही तांत्रिक गोष्टी शिकून आपण विकत असलेल्या दुधाची किंमत वाढवून मिळवा.

Krushisahayak

फायदेशीर डेअरी फार्म स्थापित करण्यासाठी येथे क्लिक करा.

दुधाळ जनावरांची निवड –

आपल्या दुग्धव्यवसायासाठी आवश्यक असलेल्या सर्वोत्तम जनावरांची खरेदी करण्याची कला व तांत्रिक माहिती शिका.

पशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन –

आपल्या गोठ्यामध्ये आजारांनी प्रवेश करू नये म्हणून दुभत्या जनावरमधील आजार व्यवस्थापन या विषयामध्ये स्वतःला परिपूर्ण बनवा.

दुभत्या जनावरांच्या गोठ्याची संरचना 

यशस्वी गोठ्यांची रचना कशी असते हे शिका व विविध प्रकारच्या गोठ्यांचे नकाशे व आराखडा मिळवा.

वासरू व कालवडींचे व्यवस्थापन –

“आजचे वासरू हे उद्याची गाय असते.” वासरू व कालवडींमध्ये शरीरवाढीचा चांगला दर मिळविण्यासाठी आणि पुनरुत्पादनात चांगली कामगिरी होण्यासाठी त्यांचे संगोपन कअसे करायचे हे शिका.

Krushisahayak

दुध व्यवसाय करताय? सरकार अनुदानावर देतंय दुधाळ गायी- म्हशी, जाणून घ्या सविस्तर…

दुभत्या जनावरांचे पोषण – 

आपल्या डेअरी फार्ममधील नफा किंवा तोटा याचा आपण जनावरांना काय खायला देतो याच्याशी प्रत्यक्ष संबंध असतो. आपला नफा वाढविण्यासाठी जनावरांना काय आहार द्यावा हे शिका.

जनावरांचे पोषण या विषयावरील प्रगत अभ्यासक्रम –

आपल्या डेअरी फार्मसाठी स्वतःचे आहाराचे सूत्र बनविण्यास शिका. शास्त्रोक्त पद्धतीने चारा व खुराकाची निवड करणारा एक्का बना. व स्वतःचे टी एम आर बनविण्यास शिका.

पैदास आणि पुनरुत्पादन समस्या –

चांगला गर्भधारणा दर मिळवण्याचा आणि दुग्धजन्य प्राण्यांची पुढची पिढी तयार करण्यामागील विज्ञान जाणून घ्या.

दुभत्या जनावरमधील स्तनदाह /मस्टायटीस 

दुग्धव्यवसायामध्ये सर्वसामान्यत: सर्वात जास्त दिसून येणारा आजार ज्यामुळे दूध उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होते. स्तनदाह किंवा मस्टायटीस हा आजार रोखण्याच्या तंत्रज्ञानात पारंगत व्हा.

Krushisahayak

आधार कार्ड वर 1% व्याजाणे मिळेल 2 लाख रुपये

रोग निदान आणि प्रयोगशाळेच्या कार्यपद्धती – 

रोगाच्या यशस्वीपणे प्रतिबंधासाठी त्याची ओळख आणि वेळेवर निदान आवश्यक आहे. dairy farm instructor syllabus प्रयोगशाळेच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्या जेणेकरून आपण पशुवैद्यकीय डॉक्टरांद्वारे आपल्या प्राण्यांचे वेळेवर उपचार करू शकाल.

डेअरी फार्मचे व्यावसायिक नियोजन – 

यांत्रिक पद्धतीचा वापर, आपल्या गोठयातील नुकसान कसे कमी करावे. अर्थसहाय्य कसे मिळवावे. विक्री व विपणन व्यवस्था कशी असावी, आणि अशा बऱ्याच गोष्टी ज्यातूमच्या डेअरी फार्मला यशस्वी व्यवसायात रूपांतरित करतील, हे सर्व आपण या विषयांत शिकुया.

Krushisahayak

सौर ऊर्जा कुंपण अनुदान आता DBT द्वारे

भ्रूण हस्तांतरण तंत्रज्ञान –

भ्रूण हस्तांतरण तंत्र हे एक ईटीटी तंत्र आहे ज्याद्वारे दाता मादी गायीकडून भ्रूण गोळा केले जातात आणि प्राप्तकर्त्या मादी गायीकडे हस्तांतरित केले जातात.तुमच्या डेअरी फार्म मध्ये उत्तम प्रजनन करण्यासाठी आणि डेअरी फार्मचा नफा वाढवण्यासाठी या ऑनलाइन अभ्यासक्रम dairy farm instructor syllabus मध्येसामील व्हा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!