PM kisan याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची बँक खाती चुकीची जोडली गेलेली आहेत, राज्यात काही बँकांचे विलीनीकरण किंव्हा ईतर कारणाने IFSC code बदलले आहेत, परिणामी या शेतकऱ्यांना किसान निधी योजनेचा लाभ ही मिळत नाही. त्यांचे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होत नाहीत.
Table of Contents
PM kisan लाभार्थी आधार प्रामाणिकरण
याच बरोबर केंद्र शासनाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ( Kisan sanman nidhi yojana) योजनेंतर्गत सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर, 2022 नंतर जमा होणारे सर्व हप्ते हे आधार संलग्न बँक खात्यात अदा करन्यात येणार आहेत.
यासाठी सर्व लाभार्थ्यांनी बँक खाती तात्काळ आधार संलग्न करावेत, असे निर्देश राज्याच्या कृषि आयुक्तांनी दिलेले आहेत.
याच बरोबर ज्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक नसल्यास अशा या योजनेच्या लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२२ नंतरचे हप्ते अदा होणार नाहीत.
त्यामुळे राज्यात एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रत्येक जिल्हा अग्रणी बँकेच्या समन्वयाने राज्यात शिबिराचे (कॅम्प) आयोजन करुन प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांचा डाटा एनपीसीआयशी आधार लिंक करण्याचे काम अशा सूचना ही सबंधित यंत्रणांना शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या होत्या.
Tomato Market भाव पडले तेव्हा सरकार कुठे होते, शेतकरी नेत्यांचा सरकारला सवाल
One Response