Weather Update यंदा मान्सूनची चाल चक्रीवादळामुळे मंदावली आहे. पावसाळा सुरू होऊन १५ दिवस होऊनही आतापर्यंत निम्म्या राज्यांमध्येही तो योग्य प्रकारे पोहोचलेला नाही. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत असलेल्या जनतेला दिलासा मिळणार आहे. तहानलेल्या महाराष्ट्राला मान्सूनचा पाऊस चिंब भिजविणार आहे. २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

असे राहील पुढील ४ आठवड्यांचे देशभरातील पाऊसमान
5 Responses