Krushisahayak

Ration Card Update 2023

Ration Card Update 2023 शेतकऱ्यांनो, रेशन नव्हे अनुदान मिळणार; तुम्ही अर्ज केला का? शेतकरी योजनेतील रेशन कार्डधारकांना धान्याऐवजी अनुदान दिले जाणार आहे. प्रति लाभार्थी १५० रुपये मिळणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी पात्र रेशन कार्डधारकांना संबंधित रेशन दुकानदारांकडे अर्ज सादर करावा लागणार आहे.

‘एपीएल योजनेतील रेशनकार्डधारकांनी विनाविलंब अर्ज करावा!’

 • राज्यातील १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकरी योजनेतील लाभाय्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यात वाशिम जिल्ह्याचा देखील समावेश आहे.
 • राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम अंतर्गत २०१३ अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.
 • सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन एनएफएसए योजनेंतर्गत गहू २२ रुपये प्रति किलो व करण्यात येत होती.
 • तथापि, सदर योजनेंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने कळवले होते.
 • ही बाब विचारात घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरू केली आहे.
 • जिल्ह्यातील १६ हजार ४०६ कार्डवरील ६१ हजार ९०९ लाभार्थीना धान्यऐवजी पैसे मिळणार आहेत.
 • ज्याचा लाभ जानेवारी २०२३ पासून मिळेल. या योजनेचा हजारो लाभार्थीना लाभ होणार आहे.
 • मात्र, अर्ज करण्याचे प्रमाण कमी असल्याने रक्कम वर्ग करण्याची पुढील प्रक्रियेसाठी विलंब होत आहे.
Ration Card Update 2023

मॉन्सून एक्स्प्रेस’ महाराष्ट्रात दाखल

एपीएल शेतकऱ्यांना आता थेट अनुदान

 • Ration Card Update 2023 एपीएल (केशरी शिधापत्रिका- धारक शेतकऱ्यांना धान्य ऐवजी पैसे वितरित केले जाणार आहेत.
 • रेशनकार्डवरील नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थीच्या नावावर थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये एका व्यक्तीस एका महिन्याला दीडशे रुपये प्रमाणे पैसे वितरित करण्यात येणार आहे.

Ration Card Update 2023 अर्ज सादर करावा लागणार

 • शेतकरी योजनेतील लाभार्थीना अन्न धान्याऐवजी प्रती लाभार्थी १५० रुपये त्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत.
 • त्यासाठी गावातील रेशनदुकानदारांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
Krushisahayak

वर्षात दहा हजारांवर कांदा चाळीं ची उभारणी करणार…

२ हजार कार्डधारक शेतकऱ्यांनी सादर केला अर्ज

 • जिल्ह्यात पात्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत जवळपास २ हजार रेशनकार्डधारकांनी स्वस्त धान्य दुकानदारांकडे अर्ज सादर केला आहे.
 • त्या अर्जावर पुढील प्रक्रिया केली जात आहे.
१४ हजारांवर कार्डधारक बाकी
 • १६ हजार ४०६ रेशनकार्डधारकांपैकी आतापर्यंत २ हजार कार्डधारकांनी अर्ज केले आहेत.
 • उर्वरित १४ हजार ४०६ जणांचे अर्ज करणे शिल्लक आहे.
 • ज्या लाभार्थीनी अद्याप अर्ज सादर केला नाही,
 • त्यांनी तत्काळ संबंधित रेशन दुकानदारांकडे अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले.
Krushisahayak

महिलांना मिळणार घरगुती पिठाची गिरणी

अनुदान मिळण्यासाठी अर्ज कसा कराल?
 • Ration Card Update 2023 धान्य ऐवजी पैसे मिळवण्याकरता बँक खात्याचा विहित नमुन्यातील अर्ज घेऊन रेशनदुकारांकडे सादर करावा, अर्जासोबत कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड चे झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, त्याचप्रमाणे कुटुंबातील महिला सदस्यांची बँक पासबुकची झेरॉक्स देणे आवश्यक आहे.

Kusum Saur Pump 2023 :कुसुम सौरपंप नोंदणी परत सुरू!

Mahadbt Pipe Yojana 2023 :महाडीबीडी पाईपलाईन योजना

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d