Headlines

Bajar bhav maharashtra 2024 कापूस रेट, सोयाबीन बाजारभाव, हरभरा भाव, तूर मार्केट

Bajar bhav maharashtra 2024 कापूस रेट, सोयाबीन बाजारभाव, हरभरा भाव, तूर मार्केट
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bajar bhav maharashtra आंतरराष्ट्रीय बाजारात आज दुपारपर्यंत सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलाच्या वायद्यांमध्ये चांगली सुधारणा झाली होती. सोयाबीन १२.२० डाॅलर प्रतिबशेल्सवर होते. तर सोयापेंड ३४६ डाॅलर प्रतिटनांवर होते. देशातील बाजारातही प्रक्रिया प्लांट्सचे भाव काही मात्र स्थिर होते.

बाजार समित्यांमधील भावपातळी दबावातच असून ४३०० ते ४५०० रुपयांच्या दरम्यान होती. तर बाजातील आवकही टिकून आहे. पुढचे काही आठवडे तरी सोयाबीनच्या भावात असेच चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Bajar bhav maharashtra

कापसाचे सरासरी भाव

देशातील बाजारात कापसाचे सरासरी भाव टिकून आहेत. देशात सध्या कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ४०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजरातील आवक टिकून आहे. कालची बाजारातील आवक ८२ हजार गाठींवर होती, असे काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने म्हटले आहे.

Krushisahayak

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आज रात्री 9 वाजता पासून पीक विमा जमा…

वायद्यांमध्ये मात्र कापसात काहीसे चढ उतार सुरु आहेत. आज दुपारपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे ९३ सेंट प्रतिपाऊंडवर होते. Bajar bhav maharashtra तर देशातील मे महिन्याचे वायदे ६२ हजार ६६० हजार प्रतिखंडीवर होते. बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमधील भावात आणखी काही दिवस चढ उतार राहू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हरभऱ्याचे भाव

हरभऱ्याचे भाव सध्या टिकून आहेत. हरभरा उत्पादनात घटीचे अंदाज येत आहेत. त्यातच हरभऱ्याला चांगला उठाव आहे. त्यामुळे हरभऱ्याला चांगला आधार मिळतोय. बाजारातील आवक हळूहळू वाढताना दिसतेय.

Krushisahayak

OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू.

पण यंदा हरभऱ्याच्या आवकेचा दबाव कमीच राहू शकतो, असे व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे सध्या हरभऱ्याला ५ हजार ४०० ते  ६ हजारांच्या दरम्यान गुणवत्तेप्रमाणे भाव मिळतोय. हा भाव आणखी काही काळातही टिकून राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

हळदीचा सरासरी भाव

Bajar bhav maharashtra हळदीच्या बाजारात चांगली तेजी आली आहे. यंदा हळदीची लागवड कमी झाली होती. त्यातच हळदीच्या पिकाला कमी पाऊस, जास्त उष्णता आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला. आता हळद काढणी सुरु आहे. त्यामुळे उत्पादकतेतील घट पुढे येत आहे. परिणामी मागील काही दिवसांपासून हळदीच्या भावातही वाढ दिसून आली.

Krushisahayak

आंतरराष्ट्रीय बाजारात आजचे बाजारभाव

हळदीचा सरासरी भाव बाजार समित्यांमध्ये आता १३ हजार ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान पोचला. तर एनसीडीईएक्सच्या डिलेव्हरी केंद्रांवरील भावपातळी १५ हजार ते १९ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. हळदीच्या भावातील सुधारणा पुढील काळातही कायम राहील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

तुरीचे भाव

तुरीच्या बाजारातील भावपातळी कायम आहे. तुरीचे भाव ऐन आवकेच्या हंगामातही टिकून आहे. दुसरीकडे तुरीची बाजारातील आवक कमीच आहे. सरकार आयात वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. पण आयातीवर देखील मर्यादा दिसून येत आहे.  परिणामी तुरीची सरासरी भावपातळी ९ हजार ५०० ते १० हजार रुपयांच्या दरम्यान टिकून आहे.

Krushisahayak

महिलाओं के लिए सब्सिडी पर सोलर आटा चक्की खरीदने का सुनहरा मौका! जानिए कैसे उठाएं लाभ

यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. Bajar bhav maharashtra त्यामुळे बाजारात आवकेचा दबाव जाणवण्याची शक्यता खूपच आहे. यामुळे तुरीचे दर टिकून राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!