Headlines

Namo shetkari yojana लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 1 हजार 792 कोटी रुपये

Namo shetkari yojana लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 1 हजार 792 कोटी रुपये
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Namo shetkari yojana राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६ हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे.

Namo Shetkar Maha Sanmanman Yojana 2nd :

Namo shetkari yojana राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे ९० लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी १ हजार ७९२ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. हा निधी लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलीय. या संदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. 

Krushisahayak

मळणी यंत्रावर मिळेले 2.5 लाख अनुदान

या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याद्वारे राज्यातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर थेट प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल. ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली. या अंतर्गत प्रत्येक वर्षात पीएम किसानच्या सोबतीला नमो शेतकरी महासन्मान योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रति वर्ष ६ हजार याप्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे. Namo shetkari yojana

एप्रिल ते जुलै २०२३ या पहिल्या हप्त्यामध्ये १ हजार ७२० कोटी रुपये निधीचे राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते. त्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२३ या दुसऱ्या हप्त्यासाठी आता १ हजार ७९२ कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून याचा लाभ राज्यातील जवळपास ९० लाख शेतकऱ्यांना मिळणार असून या महिना अखेरपर्यंत या निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिलीय.

Krushisahayak

आपल्या जागेत मोबाईलचा टॉवर लावून दर महिना 75000 ते 100000 रुपये मिळवा

राज्यात नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत या योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटींची पूर्तता करण्यात आली, यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या संख्येत सुमारे १३ लाख शेतकऱ्यांची वाढ झालीय.

काय आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना?

Namo shetkari yojana पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी योजना बनवण्यात आलेली आहे. मोदी सरकारकडून देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत येते आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर ४ महिन्यांच्या अंतराने २ हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असतो. या योजनेमुळे राज्यातील सुमारे ८६ लाख शेतकऱ्यांना फायदा होतोय. या योजनेमुळे शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान आणि नमो सन्मान योजनेचे मिळून एकूण १२ हजार रुपये वर्षाला मिळणार आहे.

Krushisahayak

एकात्मिक बाल विकास सेवा योजना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!