Body donation online registration मुंबईसह राज्याच्या अनेक भागात सध्या देहदान व अवयवदानाबाबत जागरुकता वाढत आहे. मात्र, या चळवळीने अजूनही जोर धरलेला नाही. सर्वसामान्यांच्या मनात देहदान व अवयवदानावषियी अनेक शंका आहेत.
Body donation online registration
या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यपणे उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांवर या चळवळीतील कार्यकर्त्यांमार्फत वाचकांसाठी माहिती देण्याचा हा प्रयत्न.
अवयवदानाचे प्रकार Body donation online registration
सर्वप्रथम अवयवदानाचे प्रकार समजून घेणे आवश्यक आहे. एक म्हणजे जविंतपणी करता येणारे आणि मृत्युपश्चात केले जाणारे असे दोन प्रकारचे अवयवदान असते. ब्रेनडेड पेशंटच्या अवयवांचेही दान होते.
कोणत्या अवयवांचे दान करता येते?
जिवंतपणी करता येणारे: रक्त, त्वचा व यकृत व अस्थीमज्जेचा (bone morrow) काही भाग, दोन मूत्रपिंडापैकी एका मूत्रपिंडाचे दान
मृत्यूनंतर करता येणारे: नेत्रदान व त्वचादान.
‘ब्रेन डेड’ म्हणून घोषित केल्यानंतर: नेत्र, त्वचा, अस्थी, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्या, हृदय, फुप्फुस, यकृत, स्वादुपिंड, मूत्रपिंड यांचे दान होऊ शकते.

अवयव दान करण्यासाठी येथे क्लिक करा.
ब्रेनडेड पेशंट कसा ठरवला जातो?
एखाद्या पेशंटच्या मेंदूला मार लागला किंवा मेंदूला अन्य काही कारणांमुळे इजा झाली, तर तो पेशंट ब्रेनडेड झाला, हे संपूर्णपणे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ठरवते. Body donation online registration यामध्ये सरकारने मान्यता दिलेल्या चार डॉक्टरांची टीम असते. ब्रेनडेड घोषित करण्यासापूर्वी सहा तासांत दोन वेळा अशा पेशंटची तपासणी केली जाते. मगच पेशंट ब्रेनडेड झाल्याचे नातेवाईकांना सांगितले जाते. पेशंट ब्रेनडेड झाल्याचे प्रमाणपत्रही दिले जाते. ब्रेनडेड पेशंट म्हणजे मेंदू मृत होतो पण हृदय, किडनी, लिव्हर अशा अवयवांचे कार्य सुरूच असते. या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते. अर्थात त्यासाठी नातेवाईकांची परवानगी घ्यावी लागते.
ब्रेनडेड पेशंट पेशंट वाचण्याची शक्यता असते का? कोमाचा पेशंट वाचू शकतो का?
ब्रेनडेड पेशंट पुन्हा जीवंत होण्याची शक्यता नसते. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहा तासांत दोनदा पेशंटची वैद्यकीय तपासणी करूनच ब्रेनडेड झाल्याचे घोषित करते. त्यामुळे तो वाचण्याची शक्यता नसते. ब्रेनडेड पेशंट व कोमातील पेशंट यांमध्ये फरक आहे. कोमातून पेशंट बाहेर येऊ शकतो. कोमात गेलेल्या पेशंटचे अवयव प्रत्यारोपणासाठी घेतले जात नाहीत.
दात्याच्या मृत्यूनंतर त्याचे पार्थिव त्याच्या नातेवाईकांनी किती तासांनी व कोठे न्यावे?
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयात देहदान समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीरशास्त्र विभागात देहदान इच्छापत्राचा छापील नमुना उपलब्ध आहे. तो भरून या विभागात सादर करता येतो. इच्छापत्र भरून दिल्यावर या विभागाव्दारे नोंदणीपत्र व क्रमांक, सबंधित डॉक्टर्सचे टेलीफोन नंबर, आयबँक आदीची माहितीही दिली जाते.

पीएम विश्वकर्मा योजना, छोट्या व्यावसायिकांना आधार
मृत्युशय्येवर असताना जर एखाद्या व्यक्तीने देहदानाची इच्छा व्यक्त केली, तरीही देहदान स्वीकारले जाते. Body donation online registration फक्त मृताच्या नातेवाईकांना ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. देहदान जवळच्या मेडिकल कॉलेजमध्ये करता येते. मृतदेह हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याची व्यवस्था नातेवाईकांनाच करावी लागते. मतृदेह आणताना ओळखपत्र, नोंदणी केली असल्यास त्याची माहिती, मृत्यूचा दाखला सोबत न्यावा.
त्वचादान कसे करावे आणि संपर्क कोठे साधावा?
मृत्यूनंतर सहा तासांत स्किन बँकेशी संपर्क करावा. दोन तासांत स्किन बँकेची टीम घरी पोहोचते, अवघ्या ४५ मिनिटात त्वचा काढली जाते. त्वचा काढलेल्या भागावर मलमपट्टी करून मृतदेह नातेवाईकांच्या सुपूर्द करतात. मृत्यूचा दाखला आवश्यक असतो.
नेत्रदानासाठी काय करावे?
मृत्यूनंतर तीन ते चार तासांमध्ये नेत्रदान होणे आवश्यक असते. नेत्रदात्याच्या मृत्यूनंतर त्वरित जवळच्या नेत्रपेढीला कळवणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी नेत्रदानाचे प्रतिज्ञापत्र भरले नसले, तरीही वारसदार व्यक्ती मृत व्यक्तीचे नेत्रदान करू शकतात.
झेडटीसीसी सेंटर
Body donation online registration अवयवदानाच्या चळवळीत झोनल ट्रान्सप्लान्ट कोऑर्डिनेशन कमिटी सेंटरची भूमिका महत्त्वाची असते. एखादा पेशंट ब्रेनडेड झाल्यावर झेडटीसीसीचे स्वयंसेवक हॉस्पिटलमध्ये जाऊन अवयवदानाचे महत्त्व पटवून सांगतात. ब्रेडडेड पेशंटची किडनी, लिव्हर, नेत्र असे अवयव मिळाल्यास दुसऱ्या पेशंटला नवीन जीवन मिळते.
महत्त्वाचे संपर्क क्रमांक –
देहदानासाठी संपर्क क्रमांक
ग्रँट मेडिकल कॉलेज (जे. जे. हॉस्पिटल)- २३७३५५५५
जी. एस. मेडिकल कॉलेज (केईएम हॉस्पिटल)- २४१३६०५१
टोपीवाला नॅशनल मेडकिल कॉलेज (नायर हॉस्पिटल)- २३०२७०००
लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज (सायन हॉस्पिटल)-२४०७६३८१
त्वचादानासाठी संपर्क
नॅशनल बर्न सेंटर एरोली – २७७९३३३३
नेत्रदानासाठी संपर्क
जे.जे हॉस्पिटल- २३७५०१०२
नायर हॉस्पिटल २३०२७४०२
केईएम हॉस्पिटल- २४१३१७६३
स्वयंसेवकांचे संपर्क क्रमांक
श्रीपाद आगाशे- ९९६९१६६६०७(नेत्रदान)
विनोद हरिया सु-मती ग्रुप- ९८२००५२९३६ किंवा ९८१९१ ६८५९५ किंवा ९३२२९९६७३३
अवयवदानासाठी झेडटीसीसी सेंटर
Website-www.ztccmumbai.org
One Response