PM tractor yojana 2023 online apply अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी, योजना किती खरी किती खोटी?

PM tractor yojana 2023 online apply
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM tractor yojana 2023 online apply सरकारकडून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात, यादरम्यान काही बनावट योजनांची (Fake Scheme) माहितीही व्हायरल (Viral) होत असतात. अशीच एक चर्चित योजनाe म्हणजे पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेबाबत (PM Kisan Tractor Yojana 2024) सविस्तर माहिती जाणून घ्या.

इंटरनेटवर पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट (PM Kisan Tractor Yojana 2024 Website) आहे, यावर दावा केला जात आहे की, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत (PM Kisan Tractor Yojana 2024 Application) पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर (Tractor) खरेदीसाठी सरकारकडून (Central Government) 50 टक्के सबसिडी दिली जाईल.

PM tractor yojana 2023 online apply

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना 

पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 50 टक्के सबसिडी देण्यात येत असून त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीला ट्रॅक्टर उपलब्ध होणार असल्याचंही सांगितलं जातं आहे. वेबसाईटवर या संदर्भात माहितीही उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या व्हायरल योजनेबाबत सविस्तर आणि खरी माहिती देणार आहोत.

ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकारकडून 50 टक्के सबसिडी?

पीएम किसान टॅक्टर योजने अंतर्गत 50 टक्के अनुदान मिळत असल्याने अनेक जण या योजनेसाठी अर्ज करण्याच्या प्रयत्नात आहेत. तुम्हालाही सोशल मीडिया, पोस्ट किंवा इतर काही माध्यमातून या संदर्भात माहिती मिळाली असेल आणि तुम्हीही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर, याबाबत सत्यता पडताळून घ्या.

Krushisahayak

दोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख, तर चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान

अर्ध्या किमतीत नवीन ट्रॅक्टर खरेदी करायचाय? सरकारची योजना काय? 

पीआयबी फॅक्ट चेकमध्ये या योजनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीआयबी फॅक्टचेकनुसार, पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना ही सरकारी योजना नाही. पीएम किसान ट्रॅक्टर योजनेची वेबसाईट इंटरनेटवर आहे. पण, ही वेबसाईट आणि योजना सरकारकडून राबवण्यात येत नसल्याचं समोर आलं आहे.

पीएम किसान ट्रॅक्टर योजना एक बनावट योजना असून केंद्र सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना राबवण्यात येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. ही वेबसाईट आणि योजना बनावट आहे.

Krushisahayak

PM किसान योजनेचा 16 वा हप्ता या दिवशी खात्यात जमा होणार

‘या’ योजनेसाठी अर्ज करु नका

तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू नका, कारण ही योजना बनावट असल्याचं सिद्ध झालं आहे. अनेक योजनांची मदत घेऊन अनेक फसवणूक करणारे पीएम किसानच्या नावाने अनेक वेबसाइट्स चालवत आहेत. त्यामुळे अशा बनावट वेबसाइट्सपासून दूर राहा आणि चुकूनही पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी जारी केलेल्या बनावट वेबसाइटवर अर्ज करू नका. 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *