Gir cow milk price per litre मोठी बातमी! दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपयांचं अनुदान, विखे पाटलांची मोठी घोषणा

Gir cow milk price per litre
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gir cow milk price per litre दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Milk Farmers) एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाऱ्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर 5 अनुदान (Rs 5 subsidy) देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Minister Radhakrishna Vikhe Patil)  यांनी केली.

ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, यासाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना  3.2 फॅट आणि 8.3 SNF करीता प्रति लिटर किमान 29 रुपये दूध दर  शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रोख जमा करणं बंधनकारक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील असे विखे पाटील म्हणाले. 

Gir cow milk price per litre

आभा हेल्थ कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत?

योजना  1 जानेवारी 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागू

दरम्यान, डीबीटी (DBT) करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी (Ear Tagging) लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक राहील. ही योजना दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी लागु राहणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. ही योजना आयुक्त ( दुग्धव्यवसाय विकास ) यांच्या मार्फत राबविली जाणार आहे. याबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. Gir cow milk price per litre

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्याचा सरकारचा प्रयत्न

दुध आणि दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दुध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवाय, दुधाच्या पुष्ट (Flush) काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, असे असुनही राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत आहे.

Krushisahayak

40 लाख महिलाओं का इंतजार खत्म, आज से इस राज्य में मिलेंगे फ्री स्मार्टफोन, जानें कैसे करना है अप्लाई

दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरीक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती.त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरीक्त दूध स्विकारून त्याचे दुध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरीक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता.आताही सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. Gir cow milk price per litre

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!