gatai stall yojana 2023 गटई कामगारांना 100% अनुदानावर लोखंडी स्टॉल

gatai stall yojana 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

gatai stall yojana 2023 गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याच्या स्टॉलचे ( गटई स्टॉल योजना Gatai stall yojana ) वाटप.

राज्यातील मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना करता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या (SJSA maharashtra) माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जातात आणि याच्या मधील एक महत्वाची योजना म्हणजे गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याच्या स्टॉलचे ( Gatai stall yojana ) वाटप.

राज्यात 13 फेब्रुवारी 2008 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जातीमधील अनुक्रमांक अकरा अर्थात चर्मकार प्रवर्गातील लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल चे शंभर 100% अनुदानावर वाटप करण्यासाठी ही योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे.

राज्यात अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.

gatai stall yojana 2023

या विद्यार्थ्यांना आता वार्षिक 60,000 मानधन

या योजना, उपक्रमामधील एक महत्वाची योजना म्हणजे गटई लाभार्थ्यांना लोखंडी पत्र्याच्या स्टॉलचे ( Gatai Stall Yojana ) वाटप. gatai stall yojana 2023

अकोला जिल्ह्यातील गटई कामगारांना उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, त्यांचे आर्थिक व सामाजिक जीवन उंचवावे यासाठी संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ (Lidcom) व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ( Samaj kalyan scheme for SC Maharashtra ) पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

अकोला जिल्ह्यातील चर्मोद्योग व्यवसाय करणाऱ्या गटई कामगांराना 100 टक्के अनुदानावर पत्र्यांचे स्टॉल वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

gatai stall yojana 2023 यासाठी अर्जदारा कडून अर्ज मागविले आहेत. तरी इच्छुक लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे

Krushisahayak

अन्नासाहेब पाटिल महामंडळ 15 लाख बिनव्याजी कर्ज

या योजनेच्या लाभासाठी व अधिक माहितीसाठी डॉ.बाबासोहब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट, जुनी एम.आय.डी.सी सातारा या कार्यालयात कार्यालयीन वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) विहीत नमुन्यात अर्ज करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.

gatai stall yojana 2023 अटी  पात्रता

  • अर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
  • अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.
  • अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.
  • राज्य शासन पुरस्कृत गटई स्टॉल योजना साठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.
  • जातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.
  • अर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
  • महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
Krushisahayak

गुगल पे द्वारे लोन हवंय? फॉलो करा ‘या’ 8 Steps, तात्काळ मिळेल कर्ज…

आवश्यक कागदपत्र  

  • अर्जदाराचे अथवा कुटुंबाचे रेशन कार्ड साक्षांकित प्रत 
  • गटई कामगार यांचे प्रमाणपत्र 
  • अस्वच्छ व्यवसाय प्रमाणपत्र ग्रामसेवक किंवा तहसीलदार मुख्याधिकारी नगरपरिषद यांच्या माध्यमातून दिलेले 
  • जागा ना हरकत प्रमाणपत्र याच्यासाठी ग्रामसेवक तहसीलदार मुख्याधिकारी नगरपरिषद शेत्र यांनी निर्गमित केलेल्या प्रमाणपत्र आवश्यक आहे 
  • अर्ज केलेल्या अर्जदार लाभार्थ्यांचा आधार कार्ड मतदान कार्ड आणि वयाचा दाखला ज्याच्यामध्ये शाळेचा टीसी असेल तर तो टीसी सदर ठिकाणी चालला याचप्रमाणे जागेचा दाखला आणि
  • ज्या जागेवर हा स्टॉल उभा करायचे त्या जागेचा दाखला नमुना 8 
  • शंभर रुपयाच्या बाँड वरती एक करारनामा

अशा प्रकारच्या कागदपत्रासह 15 फेब्रुवारी 2024 पूर्वी अर्ज सहाय्यकआयुक्त समाज कल्याण विभाग आयुक्त समाज कल्याण विभाग अकोला यांच्या कार्यालय मध्ये सादर करावा अशा प्रकारचा अहवाल या प्रसिद्धीपत्रकात या माध्यमातून करण्यात आलेले आहे.

Krushisahayak

शेतकऱ्यांना बांबू लागवडीकरिता अटल बांबू समृध्दी योजना

ही योजना संपूर्ण राज्यात राबविली जाते, अशाच प्रकारे इतर जिल्ह्याच्या सुद्धा अर्ज सुरू झाल्यानंतर त्या जिल्ह्याबद्दल सुद्धा आपण नक्की अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!