Why my cibil score decrease नकळत झालेल्या ‘या’ चुकीमुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो, कर्ज मिळणं होईल कठीण

Why my cibil score decrease नकळत झालेल्या 'या' चुकीमुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो, कर्ज मिळणं होईल कठीण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Why my cibil score decrease सध्याच्या काळात चांगला क्रेडिट स्कोअर (Credit Score) म्हणजेच सिबिल स्कोर (CIBIL Score) असणं खूप गरजेचं आहे. ज्याचा फायदा तुम्हाला आपात्कालीन परिस्थिती किंवा गरजेच्या वेळी कर्ज मिळवताना होतो. तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर, तुम्हाला व्याजावर सहज लोन मिळणं शक्य होतं.

Why my cibil score decrease लोक आपला क्रेडिट स्कोअर वाढवण्यासाठी क्रेडिट कार्डवरून ईएमआयवर वस्तू खरेदी करतात, पण अनेक वेळा वेळेवर ईएमआय भरल्यानंतरही त्यांचा क्रेडिट स्कोअर वाढण्याऐवजी घसरतो, असं अनेकांच्या बाबतीत होतं, पण यामागचं नेमकं कारण काय आहे, हे सविस्तर जाणून घ्या.

Krushisahayak

सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी

क्रेडिट स्कोर कमी का होतो?

जेव्हा एखादी व्यक्ती क्रेडिट कार्डद्वारे EMI वर काही खरेदी करते, तेव्हा त्याचा क्रेडिट वापर वाढतो. यामुळे क्रेडिट स्कोअर कमी होतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही क्रेडिट कार्डवर 50,000 रुपयांच्या मर्यादेसह 40,000 रुपये किमतीची वस्तू खरेदी केली असेल आणि त्याची EMI रुपये 5000 असेल.

Krushisahayak

दोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख, तर चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान

या परिस्थितीत, क्रेडिटचा वापर त्या वस्तूच्या किमतीच्या बरोबरीचा, 40,000 रुपये म्हणजेच 80 टक्के मानला जाईल. त्यामुळे ईएमआय वेळेवर भरल्यावरही क्रेडिट स्कोर कमी होईल. अशा परिस्थितीत, ईएमआय बनवताना क्रेडिटचा वापर नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. Why my cibil score decrease

क्रेडिटचा वापर किती असावा?

चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी, सामान्यतः क्रेडिटचा वापर 30 टक्क्यांपेक्षा कमी ठेवणं योग्य मानलं जातं. तुम्हाला तुमचा क्रेडिट स्कोअर वाढवायचा असेल तर, क्रेडिट युटिलायझेशन 10 ते 20 टक्के ठेवा.

Krushisahayak

कमी व्याजदरांवर वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे? ‘या’ 5 टिप्स करा फॉलो

चांगला क्रेडिट स्कोर कोणता?

चांगला क्रेडिट स्कोर नेमका किती हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. 750 ते 799 चा क्रेडिट स्कोअर खूप चांगला मानला जातो. त्याच वेळी, 700 ते 749 क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो आणि 650-699 क्रेडिट स्कोअर ठिक मानला जातो. याशिवाय 650 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर खराब श्रेणीत येतो.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *