Supima cotton price कापसाचे दर 8 हजारांच्या उंबरठ्यावर!

Supima cotton price
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिवाळीपूर्वी सात हजार रूपये प्रतिक्विंटल असलेला कापूस दिवाळीनंतर आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. Supima cotton price अकोट बाजारपेठेत कापसाला प्रतिक्विंटल ७ हजार ८२५ रूपये दर मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

भाववाढीच्या अपेक्षेने गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी कापूस राखून ठेवला होता. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. यंदाही कापूस पट्ट्यातील उत्पादक दरवाठीच्या प्रतिक्षेत असून कापूस आठ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने भाववाढीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Supima cotton price

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, शेतकरी कर्जमाफी पोर्टल सुरू..

खुल्या बाजारातील सर्वाधिक कापूस आपल्यालाच मिळावा या स्पर्धेतून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुरूवातीला ७ हजार ८०० रूपये दर दिला मात्र पुढील काळात हे दर टिकतील का नाही याची शाश्वती देता येणार नाही.

Krushisahayak

कापूस-कांदा-सोयाबीनला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचा बाजारभाव

सरकीचे दर उत्पादनही घटले

खुल्या बाजारातील गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे दर घसरले आहेत. कापसाचे दर रूई आणि सरकीच्या दरावर अवलंबून आहेत.

Krushisahayak

शेळीपालन करण्यासाठी मिळणार 2.5 लाखांपर्यंत कर्ज

गेल्या वर्षी ४ हजार २०० रूपये क्विंटल असलेली सरकी यावर्षी ३ हजार ३०० ते ३ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल पर्यंत खाली आली आहे. त्यातच यंदाच्या पावसाच्या खंडामुळे यंदा उत्पादनात प्रचंड घट होणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *