Earn and learn courses प्रत्येकाची घरची परिस्थिति सारखी नसते. घरच्या गरीब आणि हालाखिच्या परिस्थितीमुळे अनेक होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना पैशांची कमतरता भासते. अनेकांना शिक्षणासाठी फी भरण्यासाठी वेळेवर पैसे मिळत नाहीत. परिणामी, खचलेल्या मानसिक स्थितीमध्ये अनेक जण आपले शिक्षण अर्धवट सोडतात. वाढत्या वयाबरोबर घरच्या जबाबदार्या आणि पालकांच्या अपेक्षांचे ओझे सांभाळण्यासाठी अनेकांना नोकरी करण्याशिवाय काही पर्याय उरत नाही.
Earn and learn courses
Earn and learn courses मात्र, अर्धवट शिक्षण सोडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड असते. मात्र, शिक्षण आणि काम यांमधील नेमकं काय करायचं असा प्रश्न विद्यार्थ्यांना नेहमीच पडतो. पण, विद्यार्थीदशेत असतानाच तुम्ही काही ना काही काम करुन पैसे कमावू शकता. आज आम्ही याविषयी तुम्हाला माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतः कमाई करुन तुमच्या शिक्षणाचा खर्च करू शकता. शिवाय, घरच्या तुमच्या घरासाठी देखील थोडीफार आर्थिक मदत करू शकता.

लय भारी ! Google देतेय 15 हजारांचं कर्ज; 111 रुपयांनी करा परतफेड
शिकवणी (Tuition) :
तुमच्याकडे शिकवण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही घरीच शालेय विद्यार्थ्यांची शिकवणी घेवू शकता. एखाद्या विषयावर तुमचे चांगले प्रभुत्व असेल तर तुम्ही मुलांना चांगले शिकवू शकता. शिवाय, खासगी क्लासेसमध्ये एखाद-दूसरा विषय शिकवण्याचे कामही तुम्ही करू शकता. यासाठी, तुम्हाला ट्यूशन फीच्या स्वरूपात महिन्याला चांगले पैसे मिळवता येतील. Earn and learn courses याव्यतिरिक्त, खाजगी शिकवण्या (Private Tuitions) घेऊन तुम्ही पैसे कमावू शकता.
ट्रान्सलेटर बनूनही उत्तम कमाई :
तुमच्याकडे भाषांतर करण्याचे कौशल्य असेल तर तुम्ही भाषांतरकार म्हणून काम करू शकता. यासाठी तुम्हाला मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेतच, तुम्ही विविध प्रकारचे लेख भाषांतर करुन पैसे मिळवू शकता. या प्रकारची कामे मिळवण्यासाठी तुम्ही Linked, किंवा इतर सोशल माध्यमांची मदत घेऊ शकता.

‘या’ योजनेत करा गुंतवणूक, 21व्या वर्षी मुलगा होईल 2 कोटींचा मालक
यूट्यूबर बनून चॅनल चालवणे हाही उत्तम पर्याय :
तुम्ही YouTube वर विविध विषयांवर व्हिडिओ अपलोड करूनही पैसे कमवू शकता. तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमच्या अभ्यासाशी संबंधित व्हिडिओ अपलोड करू शकता. तसेच तुम्ही घरापासून दूर अभ्यास करत असाल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनाचे व्हिडिओ बनवून ते YouTube वर आपलोड करुन पैसे कमवू शकता. तुमचे YouTubeचॅनेल तुम्हाला चांगली कमाई करुन देऊ शकते.Earn and learn courses
कंटेन्ट रायटिंगला मरण नाही :
जर तुम्हाला लेखन करण्याची आवड असेल आणि तुम्ही कोणत्याही विषयावर चांगले लिहू शकत असाल तर तुम्ही कंटेन्ट रायटिंग करुन त्या बदल्यात पैसे मिळवू शकता.

Navi App से ऐसे मिलेगा इंस्टेंट पर्सनल लोन, 10 मिनट में पैसे अकाउंट में
हॉटेल किंवा रेस्टोरंटमध्ये फ्रंट डेस्कवर काम :
तुमच्यात उत्तम संभाषण कौशल्य असेल तर तुम्ही विविध Hotels आणि Restaurants मध्ये फ्रंट डेस्कवर काम करू शकता. यात, येणार्या ग्राहकांच्या समस्यांच्या निरकांपासून त्यांच्याशी उत्तम संवाद साधणे गरजेचे असते.