Krushisahayak

Pure Oil Price दिवाळी म्हटलं की प्रत्येकाच्या घरात चकल्या, शंकरपाळे इत्यादी सारखे तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. अशा स्थितीत सणासुदीच्या या काळात खाद्यतेलाचा वापरही मोठ्या प्रमाणात होतो. मागच्या वर्षी दिवाळीच्या काळात खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते, ज्यामुळे गृहिणींच्या घराचे बजेट कोलमडले होते. तथापि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाला मागणी कमी झाल्यामुळे आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्य तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर केली गेल्यामुळे देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या दरामध्ये घट झाली.

याशिवाय या दिवाळीत खाद्यतेलामुळे खाद्यपदार्थांच्या किमती वाढणार नाहीत ज्याचा फायदा ग्राहकांना नक्कीच होईल. बाजारात खाद्यतेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून देशात खाद्यतेलाचे चांगले उत्पादन झाले असून आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाले आहेत.

Pure Oil Price

मोठी बातमी! पंतप्रधान मोदींकडून देशातील 80 कोटी लोकांना दिवाळी गिफ्ट, 5 वर्षे  मिळणार मोफत रेशन

दिवाळीत खाद्यतेलाच्या किमती वाजवी राहतील

केंद्रीय तेल उद्योग आणि व्यापार संघटनेचे (सीओओआयटी) अध्यक्ष सुरेश नागपाल म्हणाले की, यावेळी खाद्यतेलाच्या किमती वाजवी राहतील. किमतीत कोणत्याही प्रकारची दरवाढ झालेली नसून सणासुदीच्या काळात तेलाच्या बाबतीत ग्राहकांनी निश्चिंत राहावे.

दिवाळीच्या काळात सोयाबीन आणि पामोलिन तेलाची मागणी वाढते ज्यांचा वापर मुख्यतः फराळ बनवण्यासाठी केला जातो. दिवाळीसाठी तयार केलेल्या फराळासाठी अनेक मोठ्या कंपन्या आणि मिठाई व्यावसायिकांनी घाऊक दरात खाद्यतेल खरेदी केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी तयार केलेल्या पदार्थांसाठी खाद्यतेल किरकोळ विक्रीमध्ये विकले जात आहे.

Krushisahayak

एक असं लोन ज्यासाठी Cibil score ची गरज लागत नाही; ना इन्कम प्रुफ आणि व्याजही कमी

Pure Oil Price रशिया- युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आवक होते. तर दोन्ही देशात गेल्या वर्षी सुरू झालेल्या संघर्षामुळे खाद्यतेलांच्या दरांनी मोठी उसळी घेतली होती. तर केंद्र सरकारने देशातील प्रमुख तेल आयातदारांना २० लाख टन तेलाच्या आयातीवर आयातशुल्क माफ केले होते. आता आयातशुल्क माफ केल्याने तेल दरात घट झाली असून जागतिक बाजारातूनही खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाच्या दरात टप्प्याटप्प्याने घट झाली.

खाद्यतेलाची मागणी वाढणार

एकंदरीत सामान्य दिवसांच्या तुलनेत सणासुदीच्या काळात खाद्यतेलाची मागणी २५% वाढते. Pure Oil Price वर्षभरात तेलाच्या किमतीत वाढ झालेली नसून येत्या काही महिन्यांतही खाद्यतेल परवडणाऱ्या दरात मिळेल, असे नागपाल सांगतात. यावेळी सोयाबीनचे उत्पन्न चांगले असून आता मोहरीची पेरणी सुरू झाली आहे. गेल्या वर्षी देशात ११२ लाख टन मोहरीचे उत्पादन झाले असून पुढील वर्षी या क्षेत्रात ५-१०% वाढ अपेक्षित आहे.

खाद्यतेलाचे दर

खाद्यतेलांचे १५ किलो दर (गेल्या वर्षी दिवाळीतील दर)Pure Oil Price

Krushisahayak

‘या’ योजनेत करा गुंतवणूक, 21व्या वर्षी मुलगा होईल 2 कोटींचा मालक

  • पाम- १३५० ते १५०० रुपये (२१०० ते २१५० रुपये)
  • सूर्यफूल – १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
  • सोयाबीन- १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
  • सरकी – १४०० ते १५५० रुपये ( २२०० रुपये)
  • वनस्पती तूप- १४०० ते १६०० रुपये (१९०० ते २००० रुपये)
  • शेंगदाणा तेल- २७०० ते २८०० रुपये (२८०० ते २९०० रुपये )

असे मिळवा जुन्यातले जुन्या दस्ताचे इंडेक्स 2

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d