Duare ration recruitment दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला मोठं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. त्यामुळं आता देशातील 80 कोटी लोकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशन मिळणार आहे.
Duare ration recruitment
देशातील कोट्यवधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील करोडो गरीब जनतेला दिवाळी भेट दिली. केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेची प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या कालावधीत 5 वर्षाची वाढ केली आहे. या योजनेंतर्गत देशातील कोट्यवधी गरीब लोकांना सरकारकडून रेशन दिले जाते. दिवाळीचा सण आठवडाभरावर असताना या योजनेच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे. यामुळं देशातील गरीब जनतेला दिलासा मिळाला आहे. Duare ration recruitment

रब्बीतही 1 रुपयातच विमा; असा करता येईल विम्यासाठी अर्ज
छत्तीसगडमध्ये पंतप्रधानांची घोषणा
छत्तीसगडमधील दुर्ग येथे पंतप्रधान एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी मोफत रेशन योजनेला पाच वर्षे मुदतवाढ देण्याची घोषणा केली. Duare ration recruitment या महिन्यात छत्तीसगडमध्ये निवडणुका होणार आहेत. 90 जागांच्या छत्तीसगड विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत पीएम मोदींच्या या घोषणेला निवडणुकीशीही जोडले जात आहे.
कोरोना महामारीनंतर केंद्र सरकारनं सुरु केली होती योजना
कोरोना महामारीनंतर केंद्र सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली होती. कोरोना महामारीनंतर लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. विशेषत: गरिबांना खाण्यापिण्याच्या संकटाचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गरीब लोकांच्या मदतीसाठी मोफत रेशन योजना सुरु केली होती. 80 कोटी देशवासी या योजनेचा लाभ घेत असल्याचे सांगण्यात येत आहे.Duare ration recruitment

एक असं लोन ज्यासाठी Cibil score ची गरज लागत नाही; ना इन्कम प्रुफ आणि व्याजही कमी
डिसेंबरमध्ये या योजनेचा कालावधी संपणार होता
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मिळतो. लाभार्थ्यांना हे धान्य मोफत मिळते. केंद्र सरकारने सर्वप्रथम 30 जून 2020 रोजी याची सुरुवात केली होती. त्यानंतर अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ही योजना डिसेंबर 2023 मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात संपणार होती. आता 5 वर्षांच्या मुदतवाढीनंतर, लोकांना डिसेंबर 2028 पर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे.

व्यवसायासाठी पैसा पाहिजे तर, सरकारच्या ‘या’ स्कीम्समधून मिळेल फायदा; पाहा डिटेल्स
नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेबद्दल म्हणाले की, भाजप सरकारने आता देशातील 80 कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देण्याची योजना आणखी 5 वर्षे वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमी पवित्र निर्णय घेण्याचे बळ देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.Duare ration recruitment