Onion price per kg येथील बाजार समितीत बुधवारी (ता. २५) उन्हाळ कांद्याला कमीत कमी २२०० रुपये, जास्तीत जास्त ४,५५१, तर सरासरी ४३०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. काही दिवसांपासून कांद्याच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.
Onion price per kg
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. लालकांद्याची आवकही सुरू झाली असून, त्याचे प्रमाण अल्प आहे. लाल कांद्याला किमान ३४०० रुपये, तर कमाल ३८००, तर सरासरी ३४०० रुपयांचा दर मिळाला.

दरम्यान, केंद्र शासनाने किरकोळ बाजारातील कांद्याच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. या निर्णयामुळे शासनाविरोधात शेतकऱ्यांची नाराजी वाढली. Onion price per kg
सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे केंद्र सरकार वारंवार सांगत आले. मात्र, सरकारने घेतलेला निर्णय किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी फोल ठरला आहे. कांद्याच्या बाजारभावात या निर्णयाचा कुठलाही परिणाम होत नसल्याचे चित्र दिसत आहे.
भारतातून कांदा निर्यात
अफगाणिस्तान, तुर्कस्तान आणि पाकिस्तानात कांद्याची उपलब्धता नसल्याने दुबई, श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर, बांगलादेशमध्ये भारतातून कांदा निर्यात होत आहे, याचा परिणाम म्हणून उन्हाळी कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

राज्यात आतापर्यंत दीड लाख गाठी कापसाची खरेदी, प्रतिक्विंटल मिळतोय ‘एवढा’ भाव…
उन्हाळी कांद्याचे दर साडेचार हजार रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भविष्यात कांदा उत्पादकांना आणखी दिलासा मिळेल, असे चित्र तयार होत आहेत. Onion price per kg
सध्या उन्हाळ कांदा शेतकऱ्यांकडे खूपच कमी प्रमाणात शिल्लक आहे. उन्हाळी कांदा संपतो, त्यावेळी बाजारात नवीन हंगामातील लाल कांदा येतो. सध्या नवीन हंगामातील लाल कांदा बाजारात आला आहे. नवीन कांद्याची आवक खूपच कमी आहे. नवीन लाल कांद्याची आवक महिन्यानंतर वाढण्याची शक्यता आहे.
पुढील एक महिना तरी बाजारात तेजी कायम
पुढील एक महिना तरी बाजारात तेजी कायम राहील. देशासह जगाला कांदा पुरविण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये उन्हाळ कांद्याची आवक निम्याने घटली आहे. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने नवीन लाल कांदा अजून अल्प प्रमाणात विक्रीस येत आहे. खरीप पिकाची स्थानिक बाजारपेठेत आवक कमी झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यात घाऊक कांद्याचे भाव आठवडाभरात जवळपास ३५ टक्क्यांनी वाढले आहेत.
