Krushisahayak

vayda bazar bhav live दिवाळीच्या मुहूर्तापर्यंत अनेक शेतकरी सोयाबीन विक्री करत असतात. तर येणाऱ्या काळात कापसाचीही आवक वाढणार आहे. सोयाबीनचे दर मागच्या एका आठवड्यापासून स्थिर असून कांद्याचे दर वाढत आहेत. तर सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.

आज राज्यभरातील सोयाबीनला हमीभावाच्या जवळपास दर मिळाला आहे. तर काही ठिकाणी हमीभावापेक्षाही अधिक दर मिळाल्याचं पाहायला मिळालं. ४ हजार ६०० रूपये हमीभाव केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे. तर चिखली बाजार समितीत आजच्या दिवसांतील सर्वाधिक ५ हजार १४० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर सोयाबीनला मिळाला. काही बाजार समित्या वगळता आज किमान दरही ४ हजारांपेक्षा अधिक होता. दिवाळीच्या तोंडावर सोयाबीनच्या दरात आणखी वाढ होण्याची आशा शेतकऱ्यांना लागलेली आहे.

Krushisahayak

महाराष्ट्र किशोरी शक्ती योजना, योजनेशी संबंधित लाभ आणि पात्रता जाणून घ्या

vayda bazar bhav live दरम्यान, कांद्यालाही बाजारात चांगला दर मिळत असल्याने इतर पिकांनी आणि पावसाने जरी धोका दिला तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळताना दिसत आहे. आज सोलापूर बाजार समितीत लाल कांद्याला सर्वाधिक ७ हजार रूपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तर ५०० रूपये किमान दर मिळाला आहे. आज राज्यभरातील बाजार समित्यांचा विचार केला तर सरासरी ३ हजार ते ५ रूपये प्रतिक्विंटल एवढा दर कांद्याला मिळाला आहे. कांद्यावरील निर्यातशुल्क वाढवल्यानंतर कांद्याला चांगला दर मिळायला सुरूवात झाल्यानंतर केंद्राने शेतकऱ्यांना आणखी एक धक्का दिला असून निर्यात मुल्यातही वाढ केली आहे.

vayda bazar bhav live

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

दरम्यान, आज उन्हाळी, लाल आणि लोकल कांद्याचीही आवक बाजारात झाली होती. जुन्नर बाजार समितीत सर्वांत जास्त म्हणजे १० हजार ३७ क्विंटल कांद्याची आवर झाली असून किमान १३०० तर कमाल ५ हजार ३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. आज संगमनेर बाजार समितीत सर्वांत कमी ३०० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. तर राज्यभरात कांद्याला ३ हजार ते ५ हजारांच्या आसपास दर मिळाला. 

Krushisahayak

आजचे कांद्याचे सविस्तर दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: