Mahanagar palika Bharti 2023: मिरा भाईंदर महानगरपालिकेत नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. पालिकेने नुकतीच एक अधिसूचना प्रसिद्ध केली असून काही विशेष पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विशेष कार्य अधिकारी, नायब तहसिलदार, उपअभियंता या पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
Mahanagar palika Bharti
Mahanagar palika Bharti या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार असून ३० ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीप्रकियेतील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया आणि मुलाखतीची तारीख याचे सविस्तर माहिती पाहूया.

नाशिक महानगरपालिकेत विविध पदांची भरती, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख
‘मिरा भाईंदर महानगरपालिका २०२३ भरती’ मधील पदे आणि पात्रता:
विशेष कार्य अधिकारी – ०१ जागा
नायब तहसिलदार – ०१ जागा
उपअभियंता – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा
पात्रता:
विशेष कार्य अधिकारी- नगररचना विभागात शासकीय/निमशासकीय सेवेत वर्ग ०१ मधील पदावर किमान ०५ वर्षे अथवा वर्ग ०२ मधील पदावर किमान १० वर्षे कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

80 हजार रुपये महीने की नौकरी चाहिए तो इन भर्तियों के लिए करें अप्लाई, खुल गया एप्लीकेशन लिंक
नायब तहसिलदार – महसुल विभागात शासकीय/निमशासकीय सेवेत वर्ग ०२ मधील पदावर किमान ०५ वर्षे कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
उपअभियंता – सार्वजनिक बांधकाम विभागात शासकीय/निमशासकीय सेवेत वर्ग- ०१ मधील पदावर किमान ०५ वर्षे अथवा वर्ग – ०२ मधील पदावर १० वर्षे कामकाजाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण:
भाईंदर
अर्ज पद्धती:
ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
आवक-जावक विभाग, मिरा भाईंदर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर Mahanagar palika Bharti

जन्मापासून 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना दरमहा 2500 रुपये मिळतील, येथून अर्ज करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
३० ऑक्टोबर २०२३
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
मुलाखतीची तारीख: ०१ नोव्हेंबर २०२३