Agriculture informatics पी एम किसानच्या पुढील हप्त्याबरोबर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे तसेच अन्य अटींची पूर्तता करण्याबाबत ऑगस्ट महिन्यापासून विशेष मोहीम राज्य शासनामार्फत राबवली होती.
Agriculture informatics
या मोहिमेद्वारे राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी कायमस्वरूपी पात्र ठरले आहेत. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत स्वत: पुढाकार घेतला आहे.

कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पुढाकार घेऊन कृषी, महसूल, भूमी अभिलेख आदी विभागांचा समन्वय साधून ई-केवायसी पूर्ण करणे, भूमी अभिलेखाच्या नोंदी अद्ययावत करणे, आधार बँक खात्याशी संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता करून घेत राज्यातील 13 लाख 45 हजार शेतकरी या दोन्हीही योजनांच्या लाभास पात्र करवून घेतले आहेत.

दुर्गम भागात ‘अझोला’ पशुखाद्याची संस्कृती, दुधात प्रति जनावर होतेय ‘एवढी’ वाढ
पी एम किसान योजना जेव्हा नव्याने सुरू करण्यात आली त्यावेळी राज्यातील सुमारे 1 कोटी 19 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत नोंदणी केली होती. Agriculture informatics त्यांपैकी सुमारे 95 लाख शेतकरी पात्र ठरले. मात्र वरील अटींची पूर्तता न केल्याने 13 व्या आणि 14 व्या हप्त्यात त्यापैकी 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना पी एम किसानचा प्रत्यक्ष लाभ मिळाला. 15 व्या हप्त्यासाठी ई-केवायसीची अट आता अनिवार्य करण्यात आली आहे. पीएम किसानच्या चौदाव्या हप्त्यात विविध कारणांनी लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने विशेष मोहीम राबविली होती.
धनंजय मुंडे यांनी घेतला वारंवार आढावा
मुळात 95 लाख पैकी मृत, कर भरणारे आणि इतर कारणांनी रद्द करून 92.87 लाख शेतकरी पात्र ठरत आहेत. पण त्यांपैकी 82.59 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण झालेले होते. Agriculture informatics धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने विशेष मोहीम हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषिमित्र यांसह कर्मचाऱ्यांनी कॅम्प घेऊन, बांधावर जाऊन 13 लाख 45 हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाते संलग्न करणे, भूमिअभिलेख नोंदी पूर्ण करून अद्ययावत करून घेणे या अटींची पूर्तता करुन घेतली.

जन्मापासून 6 वर्षांपर्यंतच्या मुलांना दरमहा 2500 रुपये मिळतील, येथून अर्ज करा
यामध्ये 9.58 लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे, 2.58 लाख शेतकऱ्यांचे खाते आधार संलग्न करणे, 1.29 लाख शेतकऱ्यांचे भूमिअभिलेख नोंदी अद्ययावत करणे बाबत कामकाज पूर्ण झाले आहे. याबाबत धनंजय मुंडे यांनी सातत्याने विभागाच्या बैठका घेऊन वारंवार आढावा घेतल्याने या कामाला आणखीनच गती प्राप्त झाली. Agriculture informatics
शिर्डीत पंतप्रधानांच्या हस्ते नमो किसान महासन्मान योजनेचा पहिला हप्ता होणार वितरित
दरम्यान, राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील सुमारे 86 लाख शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रमाणे पहिल्या हप्ता मिळणार आहे. उद्या ( गुरुवारी दि.26 ऑक्टोबर) शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाने 1720 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.