Krushisahayak

Soybean bajar bhav दहा वर्षात सोयाबीन दरात क्विंटलमागे दिड हजाराचा वाढ. सन २०१४ ते २०२३ मधील शेतमालाच्या दराचीवाढ पाहिली तर क्विंटलमागे हजार दिड हजार रूपयांचीवाढ झालेली आहे. तर खाद्य तेल आणि धान्यापासूनतयार होणाऱ्या वस्तूंच्या किंमती मात्र तिनपटीने वाढल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहे.

बीड कृषी उत्पन्नबाजार समितीमधील शेतमालाचे दर पाहिल्यास ही तफावत समोर येत आहे. धान्याचे दर जाग्यावरच असून उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी आर्थीक संकटात सापडलेले आहेत.

Soybean bajar bhav

असे आहेत बाजारभाव

बियाणांचाही खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडायला तयार नाही

दिवसेंदिवस शेतीचा अवस्था वाईट होत चालली आहे. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटे शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाहीत. Soybean bajar bhav दरम्यान, अनेकदा शेतीत घाम गाळून चांगले उत्पादन मिळाले तरी उत्पन्न चांगले होईलच, याची शक्यता कमीच आहे. गेल्या दहा वर्षांचा आलेख पाहिला तर शेतीत घातलेल्या बियाणांचा खर्चही शेतकऱ्यांच्या हाती पडायला तयार नाही. परिणामी, शेती सोडून मोलमजूरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Krushisahayak

किसान क्रेडिट कार्डावर आता मिळणार 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज…

सोयाबीनचा पेरा वाढला

बीड जिल्ह्यातील काही वर्षांत सोयाबीनचा पेरा वाढलेला आहे. सायोबीनकडे नगदी पिक पाहिले जात असल्याने कापसानंतर सोयाबीनला पसंती दिली जात आहे. सन २०१४-१५ मध्ये सोयाबीनचे क्विंटलचे दर ३१०४ होते तर आता हेच दर अवघ्या ४६५६ रूपयांवर येऊन ठेपले आहेत. मध्यल्या काळात सोयाबीन दहा हजारावर पोहचली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा चार रूपयाचा फायदा झाला होता. मात्र त्यानंतर पडलेले दर अद्याप स्थित आहेत. गतवर्षीपेक्षा २ हजार रूपये क्विंटलने दर पडलेले आहेत.

Krushisahayak

शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन करताय? अनुदानावर या योजना देतात लाभ

शेतीवर मोठे संकट ओढावणार

ही परस्थिती अशीच राहिली तर शेतीवर मोठे संकट ओढावणार आहे. सन २०१४ मध्ये खाद्य ते ५० रूपयेकिलो प्रमाणे होते तर आता ते दिडशे रूपयावर जाऊनठेपले आहे. मागील दिड-दोन वर्षांमध्ये ते दोनशेच्या घरातपोहचले होते. एकूणच शेतमालाचे भाव वाढत नसल्यानेशेती संकटात सापडलेली आहे.

दिवाळी निमित्त आनंदाचा शिधा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d