महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं सातबारा उताऱ्यात काही बदल केले आहेत. Khata check online जवळपास 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात बदल करण्यात आले आहेत. digital satbara सातबारा उतारा डाऊनलोड केला की तुम्हाला हे बदल ठळकपणे दिसून येतील.
Khata check online
सातबारा उताऱ्यातील गाव नमुना-7 मध्ये अधिकार हक्काविषयी माहिती दिलेली असते. म्हणजे तुमच्या नावावर किती जमीन आहे, याचा उल्लेख केलेला असतो. यालाच अधिकार अभिलेख असं म्हटलं जातं. satbara utara maharashtra
गाव नमुना-12 मध्ये जमिनीवरच्या किती क्षेत्रावर कोणत्या पिकांची लागवड केली आहे, याची माहिती दिलेली असते. यालाच पिकांची नोंदवही असं म्हटलं जातं. satbara utara maharashtra online 2023
सातबारा उताऱ्यातील 5 बदल
‘गाव नमुना-7’ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच Local Government Directory टाकण्यात आला आहे. गावाच्या नावासमोर कंसात हा क्रमांक दिलेला आहे. तर खातेदाराच्या नावासमोरच फेरफार क्रमांक नमूद करण्यात आला आहे. Khata check online

तुकडेबंदी कायद्यात बदल, अधिसूचना निर्गमित
सातबारा उताऱ्यावर गट क्रमांकाच्या आधी Unique Land Parcel Identification Number म्हणजेच ULPIN हा 14 अंकी नंबर देण्यात आला आहे. हा नंबर जमिनीच्या प्रत्येक भूखंडासाठी किंवा प्लॉटसाठी दिला जात आहे. ULPIN हा आपल्या आधार क्रमांकासारखाच आहे. ULPIN नंबर म्हणजे जमिनीच्या प्लॉटला दिलेला आधार क्रमांकच आहे.
जुन्या सातबारा उताऱ्यावर खाते क्रमांक ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद करण्यात आला आहे.
लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे लिहून त्यांची एकूण बेरीज करून ‘एकूण क्षेत्र’ म्हणून नमूद करण्यात आली आहे.

दोन एकर जमीन खरेदीसाठी 16 लाख, तर चार एकर जमीन खरेदीसाठी 30 लाख रुपये अनुदान
जुन्या सातबारा उताऱ्यावर मयत खातेदार, कर्ज बोजे यांच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या. आता ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात आलं आहे.Khata check online
डिजिटल सातबारा कसा काढायचा?
सातबारा उतारा ऑनलाईन काढण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा –
- https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr या वेबसाईटला भेट द्या.मोबाईल क्रमांक वापरूनही तुम्हाला सातबारा काढता येईल.त्यासाठी OTP Based Login या पर्यायावर जा.
- तुमचा मोबाईल नंबर टाका आणि Send OTP या पर्यायावर क्लिक करामोबाईलवर आलेले आकडे Enter OTPच्या खालच्या रकान्यात भरा.

अब सिर्फ 100 रुपये में कराए जमीन की रजिस्ट्री
- Verify OTP करा.आपला सातबारा नावानं एक नवीन पेज ओपन होईल.या पेजवर Digitally signed 7/12 या पर्यायावर क्लिक करा.
- ‘डिजिटल स्वाक्षरीत सातबारा’ असं शीर्षक असलेलं पेज ओपन होईल.यात सूचना दिलेली आहे की, “Rs.15 will be charged for download of every satbara. This amount will be deducted from available balance.
- ”याचा अर्थ सातबाऱ्यासाठी 15 रुपये चार्ज केले जातील.
- रिचार्ज अकाऊंट या पर्यायावर क्लिक करा.Khata check online
- डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी फॉर्मवर दिलेली माहिती भरा.
- जिल्ह्याचं, तालुक्याचं आणि गावाचं नाव निवडा.
- सर्व्हे किंवा गट नंबर टाका आणि सगळ्यात शेवटी डाऊनलोड पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर डाऊनलोड झालेला सातबारा तुम्हाला मिळेल.