Nashik Mahanagar palika Bharti 2023: नाशिक महानगरपालिका यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रिये अंतर्गत आरोग्य विभागातील अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत. पालिकेने नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील जाणून घेऊया.
Mahanagar palika Bharti 2023
Nashik Municipal Corporation Recruitment 2023: नाशिककरांसाठी एक सुवर्णसंधी आहे. नाशिक महानगरपालिकेत मोठी भरती सुरू आहे. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. Mahanagar palika Bharti 2023 या भरतीमध्ये आरोग्य विभागातील जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, ही आणि यासारखी अनेक संवर्गातील एकूण ९६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

मोदी सरकारचे अल्प-भूधारक शेतकऱ्यांना मोठ गिफ्ट दिवाळी गोड
नाशिक महानगरपालिकेने नुकतीच याबाबत अधिसूचना जाहीर केली असून इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती करिता ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २६ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती पाहूया.
‘नाशिक महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
जनरल सर्जन – ०२ जागा
फिजिशियन – ०४ जागा
स्त्रीरोगतज्ञ – ०५ जागा
बालरोगतज्ञ – ०५ जागा
रेडिओलॉजिस्ट – ०२ जागा
भूलतज्ञ – ०२ जागा
नाक कान घसा तज्ज्ञ – ०२ जागा

शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर
मानसोपचारतज्ज्ञ – ०१ जागा
दंतशल्य चिकत्सक – ०३ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – १० जागा
आयुष्य वैद्यकीय अधिकारी – २० जागा
स्टाफ नर्स – २० जागा
एएनएम – २० जागा
एकूण पदसंख्या – ९६
शैक्षणिक पात्रता:
- जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ या पदांकरिता संबधित विषयातील एमडी/डीएनबी
- दंतशल्य चिकत्सक या पदाकरिता बीडीएस
- पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता एमबीबीएस
- आयुष्य वैद्यकीय अधिकारी या पदांकरिता बीएएमएस
- स्टाफ नर्स या पदाकरिता बीएससी नर्सिंग/ जीएनएम
- एएनएम पदाकरिता एएनएम

रेलवे में 21088 से अधिक पदों पर निकली बंपर भर्ती, 10वीं 12वीं पास करें आवेदन
वेतन:
जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भूलतज्ञ, नाक कान घसा तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ या पदांकरिता – ७५ हजार (मासिक)
दंतशल्य चिकत्सक या पदाकरिता – ३० हजार (मासिक)
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता – ६० हजार (मासिक)
आयुष्य वैद्यकीय अधिकारी या पदांकरिता – ४० हजार (मासिक)
स्टाफ नर्स या पदाकरिता – २० हजार (मासिक)
एएनएम पदाकरिता – १८ हजार (मासिक)
नोकरी ठिकाण: नाशिक
अर्ज पद्धती: ऑफलाईन
निवड प्रक्रिया: मुलाखत

शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन करताय? अनुदानावर या योजना देतात लाभ
अर्ज पाठविण्याचा पत्ता: सार्वजनिक वैद्यकिय विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २६ ऑक्टोबर २०२३