Krushisahayak

भारतामधील पहिले यूपीआय एटीएम मशीन नुकतेच लाँच करण्यात आले आहे. 

Wearable atm cards and offline upi च्या मदतीने तुम्हाला कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. हे एटीएम नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने विकसित केले आहे.

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये UPI ATM मशीन कसे काम करते ते दाखवण्यात आले आहे.

भाजप नेते पीयूष गोयल यांनी यूपीआय एटीएमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.

हे एटीएम वापरण्यासाठी डेबिट किंवा क्रेडिट कार्डाची गरज नसणार आहे. एटीएम मशीनवरील क्यूआर (QR) कोड स्कॅन करून पैसे काढता येणार आहे. 

Wearable atm cards and offline upi

Blue Aadhaar कार्ड काय आहे, तुमच्या आधारपेक्षा किती आहे निराळं? 1 अप्लायपूर्वी पाहा प्रोसेस

हे मशीन कसे काम करणार?

UPI ATM मशीनवरील QR कोड स्कॅन करुन पैसे काढता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला एटीएम कार्ड सोबत न्यायची गरज पडणार नाही. Wearable atm cards and offline upi

यासाठी यूपीआय एटीएमला टच पॅनल दिलेले आहे. इथल्या UPI cash withdrawal या पर्यायावर क्लिक केलं की पैशांचे वेगवेगळे पर्याय समोर येतात.

100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये असे पर्याय दिसतात. यात तुम्हाला जितके पैसे काढायचे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर स्क्रिनवर क्यूआर कोड येईल.

शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर

यूपीआय अॅप जसं की फोन पे, पेटीएम, गुगल पे वापरून ह क्यूआर कोड स्कॅन करा.

त्यानंतर तुमचे बँक खाते निवडा. त्यानंतर तुमचा UPI पिन टाका. Wearable atm cards and offline upi मग तुम्ही निवडलेली रक्कम यूपीआय एटीएममधून बाहेर येईल.

UPI ATM चे फायदे काय?

• कार्ड-लेस व्यवहार करता येणार.
• यामुळे एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्ड बाळगण्याची गरज नाही.
• एकावेळी 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येणार.
• UPI APP वापरून वेगवेगळ्या खात्यांमधून पैसे काढता येतात.

शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर

हे मशीन देशभरात नेमके कुठे उपलब्ध करुन दिले जातील, ते समोर यायचं बाकी आहे. तुमच्या भागात हे मशीन आलं की तुमचा पैसे काढण्याचा अजून सोपा होणार आहे.

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d