Nbfc for education loan सध्या विविध क्षेत्रांमध्ये करिअरच्या अनेक संधी निर्माण झाल्याने स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विद्यार्थ्यांना देशातच नव्हे, तर परदेशातही नोकऱ्या मिळत आहेत.
Nbfc for education loan
मुलांमध्येही बदलता ट्रेण्ड पाहून अधिकची कौशल्ये आत्मसात करण्यासाठी परदेशात पदवी किंवा एखादा अभ्यासक्रम करण्याचा कल वाढला आहे. याबाबत परदेशातील अनेक मोठी विद्यापीठे, तसेच खासगी संस्था मोठ्या प्रमाणात जाहिराती करीत असतात. सोशल मीडियातही याचा प्रचार केला जातो. परदेशात शिकण्यासाठी मुलांना कर्ज मिळवून दिले जाईल, असे सांगितले जाते, परंतु असे कर्ज काढताना पुरेशी काळजी न घेतल्यास फसगत होण्याची शक्यता असते.

लोन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
बँकांशिवाय अनेक पर्याय
शिक्षणासाठी कर्ज घेण्यासाठी पूर्वी बँका हा एकमेव पर्याय होता, परंतु आता तसे नाही. अनेक नॉन बँकिंग फायनान्स कंपन्याही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
प्रोडीजी फायनान्स आणि एमपॉवर फायनान्स सारख्या अनेकआंतरराष्ट्रीय संस्थाही शिक्षणासाठी कर्ज उपलब्ध करून देत आहेत.

अनेक मोठी परदेशी विद्यापीठेही विद्यार्थ्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करतात. अनेक विद्यापीठे, तसेच संस्थांनी याबाबत विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी विशेष कक्ष सुरु केलेला असतो.
क्रेडिट स्कोअर, हमी महत्त्वाची Nbfc for education loan
या आधी कोणतेही कर्ज घेतले असेल आणि ते वेळेवर फेडले नसेल, तर त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो व नवे कर्ज काढताना अडचणी येऊ शकतात.

शैक्षणिक कर्ज मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.
जितके मोठे कर्ज घ्यायचे असेल, त्याच प्रमाणात सोने, मालमत्ता किंवा ठेवींच्या स्वरुपात हमी द्यावी लागेल.
संस्था मान्यता प्राप्त आहे का?
जाणकारांचे म्हणणे आहे की, परदेशी शिक्षणाचा पर्याय निवडताना प्रवेश घेत असलेली संस्था मान्यताप्राप्त आहे की नाही, याची खातरजमा करून घ्यावी. Nbfc for education loan
केवळ कमी फी आहे, म्हणून कसलीही मान्यता नसलेली वा विशेष ओळख नसलेली संस्था निवडणे धोक्याचे असते. या बाबतीत कर्ज मिळविताना अनेक अडचणी येऊ शकतात. शिवाय मिळालेले प्रमाणपत्रही काहीही उपयोगाचे नसते, हे नंतर लक्षात येते.