today small onion rate सोलापुरात कांद्याचा दर वाढला; पांढरा ५१००, लाल ४५०० रुपये| शंभरहून अधिक ट्रक आवक : सरासरी दरात ४०० रुपयांनी वाढ. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. मागील दोन दिवसांपासून कांद्याचा दर वाढला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी कमाल ३३०० रुपये दर होता. मंगळवारी पांढरा कांदा ५१०० रुपये आणि लाल कांदा ४५०० रुपये क्विंटल दर मिळाला आहे. दिवाळीनंतर कांद्याची मोठी आवक येण्याची शक्यता आहे.
today small onion rate
कांद्यासाठी सोलापूर बाजारपेठ देशात प्रथम क्रमांकावर आहे. डिसेंबरनंतर जवळपास १००० ट्रक कांद्याची आवक असते. मागील वर्षी जानेवारी महिन्यात दररोज ८०० ते १००० ट्रक आवक होती. त्यामुळे गाड्या बाहेर काढण्यासाठी कांदा लिलाव बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर कांद्याचा दर पडल्याने शासनाकडून अनुदान मिळाले.

आता दसरा-दिवाळीच्या तोंडावरपुन्हा कांद्याचा दर वाढला आहे. १४ऑक्टोबरला कमाल ४३०० रुपये, १६ ऑक्टोबरला १०७ ट्रक कांद्याची आवक होती, तर दर ही ४५०० रुपयांच्या घरात पोहोचला होता. मंगळवारीही लाल कांद्याला ४५०० रुपयांचा दर मिळाला. सरासरी २ हजार क्विंटल भाव आहे. पांढन्या कांद्याला पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळत आहे. सरासरी दर ही अडीच हजारांच्या घरात आहे.
जानेवारीत आवक मोठी
येणाऱ्या काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. today small onion rate शिवाय यंदा पावसाने ओढ दिल्याने आणि नंतरच्या काळात पुन्हा उशिराने कांद्याची लागवड केली आहे. तोपाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांनी माल डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किया जानेवारी महिन्यात मार्केटमध्ये येण्याची शक्यता आहे.