Krushisahayak

Government schemes for students in maharashtra: शाळांपासून कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. आता या विद्यार्थांना देखील लवकरच त्यांचा खास ओळख क्रमांक असलेली एक विशेष आयडी देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी त्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 अंतर्गत, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्री-प्रायमरी ते उच्च शिक्षणापर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडेमीक अकाउंट रजिस्ट्री (APAAR)’ नावाचा ‘वन नेशन, वन स्टू़डंट आयडी’ देण्याच्या तयारीत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असलेल्या 12 अंकी आधार आयडीपेक्षा हे वेगळे असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एपीएआर आयडी, एज्युकेशन इकोसिस्टम रजिस्ट्री किंवा एज्युलॉकर, हा आजीवन आयडी क्रमांक मानला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा आणि यशाचा मागोवा यामध्यामातून घेतला जाणार आहे.

Government schemes for students in maharashtra

महिलांना मिळणार मोफत शिलाई, आत्ताच अर्ज करा.

One Nation One ID

शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विद्यार्थ्यांसाठी APAR आयडी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. AICTE चे अध्यक्ष टीजी सीतारामन यांनी माहिती दिली आहे की APAAR आणि नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क हे संपूर्ण भारतातील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्यू आप असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासादरम्यान शिकलेल्या प्रत्येक कौशल्याची त्यात नोंद केली जाईल.Government schemes for students in maharashtra

Krushisahayak

399 व 299 रुपयात 10 लाख रुपयांचा विमा उपलब्ध, जाणून घ्या त्याचे फायदे

डेटा सुरक्षित राहणार

सरकारकडून माहिती देण्यात आली आहे की, यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती आवश्यक असेल. सरकारने आश्वासन दिले आहे की डेटा गोपनीय राहील आणि तो फक्त सरकारी एजन्सींना शेअर केला जाईल.तो देखील आवश्यक असेल तेथेच शेअर केला जाईल. ज्या पालकांनी संमती दिली आहे ते कधीही ही परवानगी कधीही मागे घेऊ शकतात. संमतीनंतर तो सेंट्रल युनिफाइड डिस्ट्रिक्ट आणि इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी शाळेची असणार आहे.

Krushisahayak

शेतकऱ्यांना ट्रॅक्टर ट्राली खरेदीसाठी 90 टक्के अनुदान, शासन निर्णय जाहीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: