sheli palan yojana : शेतीसोबतच जोडधंदा म्हणून शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ठाणबंद पद्धतीने संगोपन करण्यासाठी १० शेळ्या मेंढ्या व १ बोकड / नर मेंढा याप्रमाणे लाभार्थीना शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते.
sheli palan yojana
या योजनेंतर्गत जवळपास ७५ टक्के सबसिडी उपलब्ध करून देण्यात आलेल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदा सुरू करून आपला व्यवसाय वाढविता येणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे क्लिक करा.
काय आहे शेळी-मेंढीपालन योजना?
शेतीसोबतच इतर जोडधंदा म्हणून शेळी-मेंढी पालन योजनेतून आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे, या उद्देशाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय योजना राबविण्यात येते.
आता ७५ टक्के अनुदान sheli palan yojana
या योजनेत निवड झाल्यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थीना जवळपास ५० टक्के तर अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील लाभार्थीना ७५ टक्के अनुदान देण्यात येते.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
योजनेचा लाभ कोणाला घेता येणार?
दारिद्यरेषेखालील लाभार्थी, अत्यल्प भूधारक शेतकरी, अल्प भूधारक शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, महिला बचत गटातील लाभार्थीना या योजनेचा लाभ घेण्यात येतो. यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो.
कागदपत्रे कोणती लागणार?
अर्जासोबत फोटो ओळख पत्राची सत्यप्रत. सातबारा उतारा, ८ अ उतारा, अपत्य दाखला, स्वयंघोषणापत्र, आधारकार्ड, रहिवास प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक सत्यप्रत, रेशनकार्ड, कुटुंब प्रमाणपत्र, अनुसूचित जाती/जमाती असल्यास जातीच्या प्रमाणपत्राची सत्यप्रत आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
