Krushisahayak

Mahavitaran a1 form चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.

याअंतर्गत उमेदवारांना नागपूर येथे नोकरीची संधी मिळणार आहे. महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. 

Krushisahayak

कर्जमाफी नको, सबसिडी नको फक्त शेतात जाण्यासाठी रस्ता द्या, अमळनेरच्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एकूण पदे

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये एकूण 34 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये वीजतंत्रीची 13 पदे, तारतंत्रीची 13 पदे, कोपाची 8 पदे भरली जाणार आहेत. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट www.apprenticeshipindia.gov.inवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे

नोंदणी केल्यानंतर त्याची प्रत आणि नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे नागपूर महावितरणच्या दिलेल्या पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज भरलेल्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

Krushisahayak

सव्वाकोटी शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 25 टक्के पीकविमा मिळणार; राज्य सरकारने कंपन्यांना दिले 406 कोटी

यावेळी तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल.  येताना कागदपत्रांची झेरोक्ससोबत घेऊन येणे आवश्यक आहे. Mahavitaran a1 form यामध्ये काही त्रुटी आढळल्यास नोकरी नाकारण्याचा अधिकार संस्थेकडे राहिल याची उमेदवारांनी नोंद घ्या. 

अर्ज करण्याची पध्दत

Mahavitaran a1 form उमेदवारांनी अर्ज कसा भरायचा याची सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. महावितरणच्या विविध पदांसाठी  अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाही. तसेच उमेदवारांना महावितरणच्या नियमानुसार पगार दिला जाईल, याची नोंद घ्या.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.  9 ऑक्टोबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवार आपले अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन माध्यमातून पाठवू शकतात. त्यांनी आपले अर्ज कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या. सं.व.स विभाग, नांदगाव रोड हिंगणघाट या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in वर यासंदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d