Krushisahayak

Nashik Police Bharti : जिल्ह्यात रिक्त असलेल्या ६६६ पोलिस पाटील पदांची भरती होणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी ही माहिती दिली. (Recruitment of 666 police stations in district nashik news)

जिल्ह्यातील पोलिस पाटील भरतीसाठी https://nashik.ppbharti.in या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यासाठी एकूण १८४४ पदे मंजूर असून त्यातील ६६६ पदासाठी भरती होणार आहे. यात १९७ पदे महिलांसाठी आरक्षित आहेत.

Nashik Police Bharti

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

तालुकानिहाय रिक्त पदाची संख्या अशी, कंसात महिलांसाठी आरक्षित पदे ः

  • नाशिक २२ (७),
  • मालेगाव ६३ (१९),
  • दिंडोरी ११६ (३४),
  • कळवण ११९ (३५),
  • इगतपुरी १०० (२९),
  • येवला ६१ (१८),
  • बागलाण ५७ (१७),
  • निफाड ६९ (२१),
  • चांदवड ५९ (१७) याप्रमाणे रिक्त पदाची संख्या आहेत.
Krushisahayak

12 वी उत्तीर्णांना संधी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प येथे विविध 40 रिक्त पदांकरिता भरती

अर्जदारासाठी नियम

  • अर्जदारचे वय २५ पेक्षा कमी व ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • शैक्षणिक पात्रता इयत्ता १० वी उत्तीर्ण.
  • अर्जदार त्याच गावातील स्थानिक रहिवासी असावा.
  • अर्जदार शारीरिक दृष्ट्या सक्षम असावा.
  • कोणत्याही गुन्ह्यात दंड अगर शिक्षा झालेली नसावी.
  • ज्या प्रवर्गासाठी हे पद भरण्यात येणार आहे अशा प्रवर्गातील व्यक्तीनेच अर्ज करणे बंधनकारक. Nashik Police Bharti
  • अर्जदार सरकारी थकबाकीदार नसावा.
  • अर्जदारास मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.
  • अर्जदार कोणत्याही राजकीय पक्षाचा अथवा संघटनेचा पदाधिकारी, सदस्य नसावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d