Krushisahayak

How to start a petrol pump business पेट्रोल पंप हा व्यवसाय एक चांगला नफा देणारा व्यवसाय आहे. परंतु त्यासाठी लागणारी गुंतवणूक देखील महत्त्वाची असून काही आवश्यक परवाने देखील गरजेचे आहेत. पेट्रोल पंप कसा सुरू करावा व त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय? याची अनेकांना माहिती नाही. पण, २१ ते ५५ वयोगटातील दहावी ते बारावी शिक्षण झालेल्यांना पेट्रोल पंप सुरू करता येतो, ही वस्तुस्थिती आहे.

सार्वजनिक व खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी परवाने दिले जातात. त्या कंपन्यांमध्ये बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसीएल, रिलायन्स तसेच एस्सार ऑइल यांचा समावेश होतो. २१ ते ५५ वर्षे वयातील कोणत्याही भारतीय व्यक्तीला पेट्रोल पंप सुरू करता येऊ शकतो. शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असल्यास त्याकरिता शिक्षणाची अट किमान बारावी पास आणि ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करायचा असल्यास त्यासाठी दहावी पास अशी शैक्षणिक अट आहे.

How to start a petrol pump business

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्ज करा.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी गुंतवणूक किती?

नफ्याच्या दृष्टिकोनातून या व्यवसायाचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा देणारा व्यवसाय मानला जातो. या व्यवसायातील गुंतवणूक देखील खूप मोठी असते. काही रिपोर्टनुसार ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान १५ लाख रुपये तर शहरी भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान ३० ते ३५ लाख रुपये इतका खर्च येतो.

How to start a petrol pump business लॉटरी पद्धतीने होते अर्जदारांची निवड

ज्या पेट्रोलियम कंपन्या आहेत, ते त्यांच्या फिल्ड टीमच्या माध्यमातून काही रिसर्च करतात. त्यातून पेट्रोल पंप कोठे सुरू करायचा याचा निर्णय होतो. एखाद्या ठिकाण व्यवसाय करण्यासाठी योग्य जागा असल्यास संबंधित कंपनीकडून त्या पद्धतीचा निर्णय घेतला जातो. तत्पूर्वी, कंपन्यांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांमध्ये जाहिरात दिली जाते व इच्छुकांकडून प्रस्ताव मागवून घेतले जातात. www.iocl.com या संकेतस्थळावर त्यासंबंधीची अधिक माहिती मिळते. त्यामध्ये कंपनीच्या माध्यमातून जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर जे काही अर्ज केले होतात त्यातून लॉटरी पद्धतीने संबंधितांची निवड केली जाते.

Krushisahayak

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

पेट्रोल पंपासाठी आठशे ते बाराशे स्क्वेअर मीटरची अट

पेट्रोल पंपाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी साधारणत: आठशे ते बाराशे स्क्वेअर मीटर इतकी जागा लागते. राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गावर पेट्रोल पंप सुरू करायचा असल्यास बाराशे स्क्वेअर मीटर जागेची गरज असते. तसेच शहरातील कोणत्याही भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान ८०० स्क्वेअर मीटर जागा आवश्यक असते.

पेट्रोलपंप व्यवसायात कमिशन किती?

How to start a petrol pump business पेट्रोल पंप या व्यवसायातील मालक जे काही इंधन विकतात, त्या माध्यमातून त्यांना कमिशन दिले जाते. साधारणपणे एक लिटर पेट्रोलच्या विक्रीमागे दोन रुपये ९० पैसे तर एक लिटर डिझेलच्या विक्रीमागे एक रुपये ८५ पैसे कमिशन मिळते. इंधन दर व विक्रीवरून कमिशन निश्चित होते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पेट्रोल पंपावर वाहनधारकांसाठी सीसीटीव्ही, मोफत हवा भरणे, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृहे अशा सुविधा असणे बंधनकारक आहे.

Krushisahayak

मोदी आवास घरकुल योजना जागा खरेदीसाठी 50 हजार ₹मिळणार फ्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d