narcotics control bureau vacancy अमली पदार्थांवर प्रतिबंध करण्याचे आणि त्यांचे सेवन आणि तस्करी करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे काम एनसीबी म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे केले जाते. (Narcotics Control Bureau) केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारा हा एक महत्वाचा विभाग आहे. भारतातील अमली पदार्थांची तस्करी रोखण्यामध्ये या विभगाचे मोठे योगदान आहे. या विभागाचे काम अत्यंत गोपनीय आणि जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे असते. अशा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये भरती सुरू असून इंटेलिजन्स ऑफिसर या पदाच्या ६८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
narcotics control bureau vacancy
या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरू असून १६ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊया..
एनसीबी भरतीमधील मधील पद आणि पदसंख्या:
इंटेलिजन्स ऑफिसर – ६८ जागा
एकूण रिक्त जागा ६८

अधिक माहितीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची अधिकृत वेबसाईट
वयोमर्यादा:
जास्तीत जास्त ५६ वर्षे वय असावे.
narcotics control bureau vacancy पात्रता:
या पदासाठीची पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करावे.

अर्ज करण्याची पद्धती:
ऑफलाईन
अर्ज पाठवण्पयाचा पत्ता:
उपमहासंचालक (मुख्यालय), एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमांक १, विंग क्रमांक ५, आर.के.पुरम, नवी दिल्ली – ११००६६

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
१६ सप्टेंबर २०२३
अर्ज कसा करावा:
या भरती साठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. अधिसूचनेत नमूद केल्या प्रमाणे सर्व तपशील आणि दस्तऐवज यांची पूर्तता करून तो वर दिलेल्या पत्त्यावर विहित वेळेच्या आधी म्हणजे १६ स्पटेंबर पर्यंत पोहोचायला हवा.
